कारखान्यात झालेल्या स्फोटाने गुरुग्राम हादरले, अपघातात 9 जणांचा मृत्यू

या घटनेत अनेक मजूर जखमी झाल्याचीही माहिती मिळत आहे.


विशेष प्रतिनिधी

गुरुग्रामच्या दौलताबाद जिल्ह्यातील औद्योगिक परिसरातून शनिवारी सकाळी कारखान्यात भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. हा कारखाना गुरुग्राम-द्वारका एक्सप्रेसवेजवळ आहे. या स्फोटात 9 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. अद्याप याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. त्याचबरोबर या घटनेत अनेक मजूर जखमी झाल्याचीही माहिती मिळत आहे.Factory blast rocks Gurugram 9 killed in accident



अग्निशमन दलही घटनास्थळी पोहोचले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बॉयलर फुटल्याने हा स्फोट झाला. या भीषण स्फोटात जवळपासची घरे आणि इमारतींचेही नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे.

Factory blast rocks Gurugram 9 killed in accident

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात