फ्रान्समधल्या कोणा नोबेल विजेत्या शास्त्रज्ञाच्या नावाने एक पोस्ट फिरत होती की कोरोना प्रतिबंधक लस घेतलेल्यांचा दोन वर्षांत मृत्यू होईल. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने या पोस्टचे फॅक्टचेक करून खंडण करणारी पोस्ट टाकली. मात्र, फेसबुक आणि इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना आम्हीच फॅक्टचेक करता अशी मस्ती असल्याने त्यांनी चक्क पीआयबीची पोस्ट हटविली. सरकारतर्फे चांगला दट्या लावल्यावर ही पोस्ट पुन्हा रिस्टोअर करण्यात आली. Facebook, Instagram deleted PIB’s fact cheke post
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली :फ्रान्समधल्या कोणा नोबेल विजेत्या शास्त्रज्ञाच्या नावाने एक पोस्ट फिरत होती की कोरोना प्रतिबंधक लस घेतलेल्यांचा दोन वर्षांत मृत्यू होईल. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने या पोस्टचे फॅक्टचेक करून खंडण करणारी पोस्ट टाकली. मात्र, फेसबुक आणि इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना आम्हीच फॅक्टचेक करता अशी मस्ती असल्याने त्यांनी चक्क पीआयबीची पोस्ट हटविली. सरकारतर्फे चांगला दट्या लावल्यावर ही पोस्ट पुन्हा रिस्टोअर करण्यात आली.
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली होती. यामध्ये फ्रान्सच्या एका शास्त्रज्ञाच्या हवाल्याने वृत्त दिले होते की कोरोना प्रतिबंधक लस घेतलेल्या प्रत्येकाचा दोन वर्षांत मृत्यू होईल. त्यावर कोणताही उपचार नाही. ही पोस्ट भारतातही चांगलीच व्हायरल झाली होती. त्यामुळे लोकांमध्ये धास्तीचे वातावण निर्माण झाले होते. त्यामुळे प्रेस इन्फॉर्मेशन (पीआयबी) या सरकारी संस्थेमार्फत फॅक्टचेक करण्यात आले. या प्रकारचे कोणतेही संशोधन झालेले नाही. ही पोस्ट पूर्णत: चुकीचे आहे, असे म्हटले होते.
पीआयबीच्या अधिकृत अकाऊंटवरून फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरही ही पोस्ट शेअर करण्यात आली होती. मात्र, या दोन्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने चुकीची माहिती असल्याचे म्हणून ही पोस्ट हटविली. त्याचबरोबर चुकीच्या बातम्यांचा प्रसार केल्यास आपले पेज प्लॅटफॉर्मवरून हटविले जाईल असा इशाराही दिला.
पीआयबीने माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (आयटी) याची तक्रार केली. आयटी मंत्रालयाने फेसबुक आणि इन्स्टाग्राम यांना जाब विचारला. त्यावेळी मात्र मशीनमध्ये चूक झाल्याने अनावधानाने ही पोस्ट हटविण्यात आली आणि पीआयबीला इशारा देण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर लगेचच फेसबुक आणि इन्स्टाग्रामने ही पोस्ट पुन्हा रिस्टोअर केली.
यापूर्वीही पीआयबीकडून स्टेर्राईडसच्या वापराबाबत एक फॅक्ट चेक करून अफवांचे खंडन करण्यात आले होते. मात्र, त्यावेळी फेसबुक आणि इन्स्टाग्रामकडून ती पोस्ट हटविण्यात आली होती.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची फॅक्ट चेक यंत्रणा नक्की कशा पध्दतीने काम करते याची माहिती देण्याचे आदेश आयटी मंत्रालयाने दिले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App