वॉशिंग्टन – फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सॲप आणि मेसेंजर या सोशल मीडिया सेवा काल रात्री सुमारे सहा तास खंडित झाल्याने जगभरातील कोट्यवधी युजर्स हवालादिल झाले.Face Book lose 40 billion dollars in 6 hours
या बंद पडल्याने जागतिक बाजारात विविध कंपन्यांचे १६ कोटी डॉलरचे नुकसान झाले. फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांना सात अब्ज डॉलरचा फटका बसला, तर फेसबुकचे ४० अब्ज डॉलरचे नुकसान झाले असावे असे तज्ञांचे मत आहे.
जगातील सर्वांत मोठ्या सोशल मीडिया कंपनीच्या सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या तीन सेवा एकाच वेळी बंद पडण्याचा हा प्रकार दुर्मीळ मानला जातो. जगभरातील साडे तीन अब्ज लोक फेसबुकचा वापर एकमेकांशी संवाद साधण्यासाठी आणि व्यवहार करण्यासाठी करतात.
‘फेसबुक’च्या मालकीच्या या सर्व सोशल मीडिया सेवा काही काळ बंद पडल्या होत्या. चुकीच्या पद्धतीने कॉन्फिगरेशन बदलले गेल्याने हा प्रकार घडल्याचे ‘फेसबुक’ने सांगितले. या सेवा बंद असण्याच्या काळात ग्राहकांच्या खासगी माहितीशी कोणतीही तडजोड झाली नसल्याचेही कंपनीने स्पष्ट केले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App