राहुल गांधींच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करत आसाम पोलिसांवर आरोपही केला आहे.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेदरम्यान आसाममध्ये झालेल्या चकमकींबाबत काँग्रेसने मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा  यांच्या सरकारवर शाब्दिक हल्ला सुरूच ठेवला आहे. तर आता काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना याबाबत पत्र लिहिले आहे. राहुल गांधींची सुरक्षा पुन्हा पुन्हा धोक्यात असल्याचे खर्गे यांनी शाह यांना सांगितले आहे. याबाबत त्यांनी आसाम पोलिसांवर आरोपही केले आहेत.Expressing concern about Rahul Gandhi’s security he has also accused the Assam Police



काय म्हणाले मल्लिकार्जुन खर्गे ?

काँग्रेस अध्यक्षांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, मणिपूर ते मुंबई अशी १४ जानेवारीला सुरू झालेली भारत जोडो यात्रा आसाममध्ये पोहोचल्यानंतर असे काही प्रसंग घडले, की झेड प्लस सुरक्षा प्राप्त राहुल गांधींच्या सुरेक्षेसाठी येऊ इच्छित होती. सुरक्षा अरुणाचल प्रदेशातून काँग्रेसची यात्रा आसामच्या सोनितपूर जिल्ह्यात परतली तेव्हा तेथील स्थानिक अधीक्षक, जे सीएम सरमा यांचे बंधूही आहेत, यांनी काँग्रेसच्या यात्रेवर भाजप कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्याला प्रेक्षक म्हणून बघितले, असाही आरोप खर्गे यांनी केला.

यावेळी खर्गे म्हणाले की, भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस सोशल मीडिया टीम आणि पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांच्याशी झटापट केली आणि त्यांच्या गाडीवरही हल्ला केला. या लोकांनी भारत जोडो न्याय यात्रेच्या विरोधात घोषणाबाजी केली आणि वाहनांवरील यात्रेचे पोस्टरही फाडले.

अमित शाह यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करून यात्रा नियोजित प्रमाणे पार पडावी, अशी मागणी खर्गे यांनी केली. राहुल गांधी किंवा भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होणारा काँग्रेसचा कोणताही कार्यकर्ता जखमी होऊ नये आणि यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांचा हस्तक्षेप आवश्यक आहे, असे ते म्हणाले.

Expressing concern about Rahul Gandhi’s security he has also accused the Assam Police

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात