वृत्तसंस्था
लखनौ : विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा चमकला, पण विराट सकट भारताचा डाव ढेपाळला!!, अशी स्थिती लखनऊ मध्ये आली. भारताला प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांमध्ये 9 बाद 229 अशी किरकोळ धावसंख्या उभारता आली. England vs india cricket world cup 2023
आत्तापर्यंतच्या पाच सामन्यांमध्ये वेगवेगळ्या संघांविरुद्ध धडाडणाऱ्या फलंदाजीच्या तोफा इंग्लंडच्या गोलंदाजी समोर फुसका बार काढत्या झाल्या. रोहित शर्मा 87 सूर्यकुमार यादव 49 आणि के. एल. राहुल 39 हे फलंदाज वगळता बाकी सगळे फलंदाज सिंगल डिजिटमध्ये तंबूत परतले. यामध्ये भारताचा सर्वात मोठा सुपर स्टार फलंदाज विराट कोहली शून्यावर तंबूत परतला. त्यानंतर भारताचा डाव ढेपाळायला सुरुवात झाली. ती के. एल. राहुल आणि सूर्यकुमार यादवने थोडीफार सावरली. त्याच्या 49 धावांच्या बळावर भारताची धावसंख्या 200 च्या पार जाऊ शकली आणि शेवटच्या एक-दोन षटकांमध्ये जसप्रीत बुमराहने दोन चौकार मारून 9 बाद 229 वर डाव संपवला. श्रेयस अय्यर पुन्हा अपयशी ठरला.
आज सकाळी इंग्लंडचा कर्णधार बेन स्टॉसने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली आणि भारताला फलंदाजी दिली. त्याचा हा निर्णय भारतीय फलंदाजांनी ढेपाळती फलंदाजी करत अत्यंत अचूक ठरविला. इंग्लंडच्या गोलंदाजांच्या अचूक गोलंदाजी पेक्षा भारतीय फलंदाजांनी स्वतःच्या चुकांनी भारताची फलंदाजी ढेपाळवली. विराट कोहली, के. एल. राहुल, सूर्यकुमार यादव वगैरेंनी सोपे झेल देऊन खेळपट्टी सोडली. रवींद्र जडेजा पायचित झाला, तर शतकाकडे वाटचाल करत असलेल्या कर्णधार रोहित शर्माचा फटका चुकला आणि काहीसा अवघड झेल जाऊन तो बाद झाला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App