सलग सहाव्यांदा RBI ने व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेने तीन दिवसीय चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीचे निकाल जाहीर केले आहेत. यावेळी पुन्हा RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही. आरबीआयने रेपो दर 6.50 टक्के कायम ठेवला आहे. सलग सहाव्यांदा RBI ने व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. EMI will not go up RBI did not change the repo rate again
द्विमासिक पतधोरण आढाव्याची घोषणा करताना आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, जागतिक स्तरावर अनिश्चिततेच्या काळात देशाची अर्थव्यवस्था बळकटी दाखवत आहे, एकीकडे आर्थिक विकास वाढत आहे, तर दुसरीकडे चलनवाढ कमी झाली आहे. चलनविषयक धोरण समिती ( MPC) ने महागाई नियंत्रित करण्यासाठी आणि आर्थिक वाढीला चालना देण्यासाठी अनुकूल भूमिका मागे घेण्याची आपली भूमिका कायम ठेवली आहे.
ते म्हणाले की देशाच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग वेगवान आहे आणि तो बहुतेक विश्लेषकांच्या अंदाजांना मागे टाकत आहे. 2024 मध्ये जागतिक विकास दर स्थिर राहण्याची अपेक्षा आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App