विशेष प्रतिनिधी
मुंबई : कल्याण रेल्वे स्टेशनवर रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या एका वृद्ध व्यक्तीचा जीव एक्सप्रेसच्या लोको पायलटमुळे वाचला आहे. रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास मुंबई वाराणसी एक्सप्रेस निघाली होती.Emergency break of express Applied In time due to which old man saved
त्यादरम्यान एक वृद्ध व्यक्ती रेल्वेरूळ ओलांडत होती. ही बाब लक्षात आल्यानंतर मध्य रेल्वेचे अधिकारी संतोष कुमार यांनी एक्सप्रेस थांबवण्याची सूचना लोको पायलटला केली. लोकोपायलट एस.के.प्रधान आणि असिस्टंट लोको पायलट रवी शंकर यांनी इमर्जन्सी ब्रेक लावला. त्यामुळे रेल्वे जागीच थांबली. परंतु इंजिनाखाली तो वृद्ध अडकला होता. त्या वृद्धाला सुखरूप बाहेर काढण्यात यश आल आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App