Elvish Yadav : एल्विश यादव, गायक फाजिलपुरियाला धक्का! EDने मालमत्तांसह, बँक खातीही केली जप्त

Elvish Yadav

या प्रकरणी उत्तर प्रदेश आणि हरियाणामधील काही मालमत्ता जप्त करण्यात आल्या


विशेष प्रतिनिधी

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) यूट्यूबर एल्विश यादव  ( Elvish Yadav ) आणि गायक राहुल यादव उर्फ ​​फाजिलपुरिया यांच्यावर मोठी कारवाई केली असून त्यांची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता आणि बँक खाती जप्त केली आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी उत्तर प्रदेश आणि हरियाणामधील काही मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत.

ईडीने यापूर्वी दोन्ही सेलिब्रिटींची सखोल चौकशी केली होती. त्यांचे जबाब नोंदवून प्रकरणाची चौकशी करण्यात आली. तपास यंत्रणेने प्रदीर्घ चौकशीनंतर ही कारवाई केली, त्यामुळे त्याच्याविरोधातील मनी लाँड्रिंगचे प्रकरण अधिक मजबूत झाले आहे.



या प्रकरणाची मुळे नोएडा पोलिसांच्या कारवाईशी जोडलेली आहेत, जेव्हा एल्विश यादवला सापाच्या विषाच्या विक्री आणि खरेदी प्रकरणी अटक करण्यात आली होती. या अटकेनंतर ईडीने हा संपूर्ण भाग मनी लाँड्रिंगच्या संदर्भात नोंदवला आणि तपास सुरू केला. या विषाच्या व्यापारातून जमा झालेली रक्कम बेकायदेशीरपणे अन्य मार्गाने गुंतवली गेली, असा आरोप आहे, त्या आधारावर ईडीने कारवाई केली.

ईडीच्या कारवाईत जप्त केलेल्या मालमत्तेची किंमत करोडोंच्या घरात असल्याचे बोलले जात आहे. याशिवाय काही बँक खातीही जप्त करण्यात आली आहेत. या मालमत्ता प्रामुख्याने यूपी आणि हरियाणामध्ये आहेत, ज्यामध्ये दोन्ही सेलिब्रिटींची हिस्सेदारी असल्याचे आढळून आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून येत्या काळात आणखी काही खुलासे होण्याची शक्यता आहे.

Elvish Yadav singer Fajilpuria shocked ED seized bank accounts along with properties

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात