वृत्तसंस्था
नवी दिल्ली : एक तर जुनी वाहने इलेक्ट्रिक करून घ्या, अन्यथा स्क्रॅप करा, असा नवा नियम १ जानेवारीपासून दिल्लीत लागू केला आहे. वाढत्या प्रदूषणापासून मुक्तता मिळविण्यासाठी हा उपाय दिल्ली परिवहन विभागाने केला आहे. Electrify old vehicles, or scrap them; New rules in Delhi from 1January 2022
दिल्लीत १ जानेवारी २०२२ पर्यंत १० वर्षे पूर्ण करणाऱ्या डिझेलवर चालणाऱ्या सर्व वाहनांची नोंदणी रद्द केली जाईल.ज्या मालकांना वाहन इतर राज्यात हस्तांतरित करायचे आहे. त्यांना एनओसी दिली जाईल,जेणेकरून वाहनांची पुनर्नोंदणी इतरत्र करता येईल. एनजीटीच्या आदेशानुसार दिल्ली-एसीआरमध्ये १० वर्षे जुनी डिझेल आणि १५ वर्षे जुनी पेट्रोल वाहने चालवण्यास आता बंदी घातली आहे.
एकच पर्याय इलेक्ट्रिक वाहनांमध्ये रूपांतर
डिझेल आणि पेट्रोल वाहने इलेक्ट्रिक वाहनांमध्ये कन्व्हर्ट करुन चालवता येतील,असे म्हटले आहे.मात्र सरकारने मान्यता दिलेल्या रेट्रोफिटेड कंपन्यांकडूनच किट बसवावे लागतील.ज्या वाहनांची नियमानुसार पुनर्नोंदणी इतर राज्यात होऊ शकत नाही,ती वाहने स्क्रॅप पॉलिसीअंतर्गत भंगारात काढावी लागतील.
दुसरीकडे दिल्ली परिवहन विभागाने अधिकृत स्क्रॅपर्सची यादी तयार केली आहे जिथे वाहने स्क्रॅप केली जाऊ शकतात.दिल्ली सरकारच्या परिवहन विभागाने स्क्रॅपर्सची यादी www.http://transport.delhi.gov.in वर प्रसिद्ध केली आहे. जे लोक या नियमाचं पालन करणार नाहीत त्यांची वाहने जप्त करून त्यांना दंड होणार आहे.
भंगार धोरण राबविणार
सर्वोच्च न्यायालयाने याबाबत पूर्वीच आदेश जारी केला होता.खासगी वाहनाला २० वर्षांनंतर आणि व्यावसायिक वाहनाला १५ वर्षांनंतर ऑटोमेटेड फिटनेस टेस्ट द्यावी लागेल. उत्तीर्ण न होणाऱ्या वाहनांच्या मालकांकडून मोठा दंड आकारण्यात येणार आहे.तसेच वाहने जप्त होणार आहेत. फिटनेस टेस्ट उत्तीर्ण वाहनांना चालवण्याची परवानगी अन्यथा ती भंगारात पाठवली जातील.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App