वृत्तसंस्था
नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीपूर्वी अधिकाऱ्यांच्या बदल्यासंदर्भात मोठा धोरणात्मक बदल केला आहे. निवडणुकीपूर्वी ज्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जातील त्यांना त्या मतदारसंघातील दुसऱ्या जिल्ह्यात नियुक्ती देऊ नये, अशा सूचना आयोगाने देशातील सर्व राज्यांना दिल्या आहेत.Election Commission policy before Lok Sabha elections; Officers will be transferred outside the constituency
राज्य सरकारे अधिकाऱ्यांच्या बदल्या करताना त्याच मतदारसंघात येणाऱ्या दुसऱ्या जिल्ह्यात करीत आहेत, अशा तक्रारी आयोगाकडे आल्या होत्या. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. राजीवकुमार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, निवडणूक आयोगाच्या धोरणानुसार आपल्या गृह जिल्ह्यात नियुक्ती असलेले अथवा एखाद्या ठिकाणी तीन वर्षांपेक्षा अधिक काळ झाला आहे त्या अधिकाऱ्यांची लोकसभा अथवा विधानसभा निवडणुकीपूर्वीच बदली केली जाते.
जाहीरनाम्यात आश्वासनाचा पक्षांना हक्क
राजकीय पक्षांना जाहीरनाम्यात आश्वासन देण्याचा हक्क आहे तसेच राजकीय पक्षांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्ती होणार किंवा नाही हे जाणून घेण्याचा मतदारांचाही हक्क आहे,असे मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार म्हणाले. निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी ते चेन्नईत आले होते. राजकीय पक्षांनी दिलेली आश्वासने वास्तवाला धरून आहेत का तसेच ते पूर्ण करण्यासाठी आर्थिक तरतूद कशी केली जाणार आहे याचाही हक्क मतदारांना आहे असे ते म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more