वृत्तसंस्था
नवी दिल्ली : नवीन वर्षापूर्वीच सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता खाद्यतेल स्वस्त मिळणार आहे. कारण,अनेक प्रमुख एडिबल ऑईल कंपन्यांनी खाद्यतेलाची कमाल किरकोळ किंमत म्हणजे एमआरपी (MRP) कमी केली आहे.Edible Oil: Happy New Year! Great relief for all! Edible oil became cheaper; major companies cut prices
उद्योग संघटना सॉल्व्हेंट एक्सट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया एसईए (SEA) ने सोमवारी म्हटले की, अदानी विल्मर आणि रुची सोयासह प्रमुख खाद्यतेल कंपन्यांनी (edible oil major brands) ग्राहकांना दिलासा देण्यासाठी आपल्या उत्पादनांच्या एमआरपीमध्ये 10-15 टक्के कपात केली आहे.
या कंपन्यांनी कमी केले दर
SEA नुसार, अदानी विल्मर (फॉर्च्यून ब्रँड), रुची सोया (महाकोष, सनरिच, रुची गोल्ड आणि न्यूट्रेला ब्रँड), इमामी (आरोग्य आणि स्वादिष्ट ब्रँड), बंज (डालडा, गगन, चंबळ ब्रँड) आणि जेमिनी (फ्रीडम सनफ्लॉवर ऑईल ब्रँड्स) सारख्या मोठ्या ब्रँडने खाद्यतेलांच्या किंमती कमी केल्या आहेत.
याशिवाय COFCO (न्यूट्रीलाईव्ह ब्रँड), फ्रिगोरिफिको अल्लाना (सनी ब्रँड) आणि गोकुळ अॅग्रो (विटालाईफ़, महेक आणि जॅका ब्रँड) आणि इतरांनी सुद्धा किंमती कमी केल्या आहेत.
एसईएने आपल्या वक्तव्यात म्हटले की, आम्हाला हे सांगताना आनंद होत आहे की,प्रमुख खाद्यतेल कंपन्यांनी सणासुदीच्या काळात ग्राहकांना दिलासा देण्यासाठी त्यांच्याकडून मार्केटिंग करण्यात येणार्या खाद्यतेलांवर एमआरपी 10-15 टक्के कमी केली आहे.
आगामी महिन्यांमध्ये आणखी कमी होतील दर!
ग्राहकांना मदत करण्याच्या उद्देशाने केंद्रीय अन्न सचिव सुधांशु पांडे यांनी काही दिवसांपूर्वी उद्योग जगतातील नेत्यांची एक बैठक आयोजित केली होती आणि त्यांना विनंती केली होती की, आयात शुल्क कमी करण्यासाठी सकारात्मक प्रतिक्रिया द्यावी, ज्याची घोषणा सरकारने केली होती.
उद्योग संघटनेने म्हटले की, त्यांना आशा आहे की, आगामी महिन्यांमध्ये आंतरराष्ट्रीय किमतीत नरमीसह स्थानिक मोहरीच्या मोठ्या पिकाच्या अपेक्षासह नवीन वर्ष ग्राहकांसाठी खुशखबर घेऊन येईल.
एसईएने पुढे म्हटले की, खाद्यतेलांच्या किमतींना लगाम लावण्यासाठी सरकारने यावर्षी अनेकदा रिफाईंड आणि कच्चे, दोन्ही खाद्य तेलावंर आयात शुल्क कमी केले आहे.आयात शुल्कात शेवटची कपात 20 डिसेंबरला सरकारने केली होती, जेव्हा रिफाईंड पाम तेलावर मुळ सीमा शुल्क 17.5 टक्केवरून कमी करून 12.5 टक्के केले होते, जे मार्च 2022 च्या अखेरपर्यंत होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App