विशेष प्रतिनिधी
पाटणा : MLA Alok Mehtas शुक्रवारी सकाळी बिहार सरकारमधील माजीमंत्री आणि राजद आमदार आलोक मेहता यांच्या निवासस्थानी ईडीच्या पथकाने छापा टाकला. मिळालेल्या माहितीनुसार, बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी आमदार आलोक मेहता यांच्या घरावर छापे टाकण्यात आले आहेत.MLA Alok Mehtas
सक्तवसुली संचालनालय (ईडी) ची टीम सकाळपासून आरजेडी आमदार आलोक कुमार मेहता यांच्या निवासस्थानी छापे टाकत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ईडीचे पथक मनी लाँड्रिंग प्रकरणात नेत्याशी संबंधित डझनभराहून अधिक ठिकाणी कारवाई करत आहे.
ईडीच्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर आमदारांच्या निवासस्थानाबाहेरही कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. आलोक मेहता हे आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यांच्या कुटुंबाच्या खूप जवळचे आहेत.
ते बिहारच्या उजियारपूर विधानसभा मतदारसंघाचे राजद आमदार आहेत आणि महाआघाडी सरकारमध्ये ते जमीन महसूल आणि शिक्षण मंत्री देखील राहिले आहेत. २०२० च्या बिहार विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपचे शील कुमार रॉय यांचा २३,००० पेक्षा जास्त मतांनी पराभव केला.
आलोक मेहता २००४ मध्ये उजीयारपूर लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना पक्षाने उजीयारपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती परंतु त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. मेहता यांचे वडील तुलसीप्रसाद मेहता हे देखील लालू सरकारमध्ये मंत्री होते. बिहारमध्ये जेव्हा जेव्हा महाआघाडीचे सरकार स्थापन झाले तेव्हा तेव्हा आलोक मेहता यांना मंत्री बनवण्यात आले. त्यांनी पक्षात अनेक महत्त्वाची पदेही भूषवली आहेत.
ते राष्ट्रीय जनता दलाचे संस्थापक सदस्य आहेत आणि त्यांनी पक्षाच्या प्रधान सरचिटणीसपदाची जबाबदारीही सांभाळली आहे. त्यांना तेजस्वी यादव यांचे राजकीय गुरु देखील म्हटले जाते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App