आयएएस विनय चौबे यांच्या ठिकाणांसह अन्य जागांचा समावेश
विशेष प्रतिनिधी
रांची : Ranchi झारखंड विधानसभा निवडणुकीपूर्वी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) रांचीमध्ये मोठी छापेमारी केली आहे. मद्य घोटाळा प्रकरणी आयएएस अधिकारी विनय चौबे यांच्या ठिकाणांसह ईडीने 15 ठिकाणी छापे टाकले आहेत.Ranchi
वरिष्ठ आयएएस अधिकारी विनय चौबे यांच्याशिवाय उत्पादन शुल्क विभागाचे सहसचिव गजेंद्र सिंह आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या चार्टर्ड अकाउंटंट (सीए) यांच्या जागेवर छापे टाकण्यात आले आहेत.
छत्तीसगड पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखा EOW ने या प्रकरणी उत्पादन शुल्क विभागाचे तत्कालीन सचिव विनय कुमार चौबे आणि सहसचिव गजेंद्र सिंह यांच्याविरुद्ध आधीच एफआयआर नोंदवला होता.
रांचीच्या विकास कुमारने एफआयआर नोंदवण्यासाठी अर्ज केला होता. त्यानंतर रायपूरमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला. दारू घोटाळ्याचा संपूर्ण कट रायपूरमध्येच रचला गेला आणि अबकारी धोरण बदलण्यात आल्याचे अर्जात म्हटले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App