30 वैद्यकीय विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक.
विशेष प्रतिनिधी
जम्मू-काश्मीर : उधमपूरमध्ये मंगळवारी मोठी दुर्घटना घडली आहे. येथे एक मिनी बस अचानक दरीत कोसळली. यादरम्यान 30 जण जखमी झाले. बचाव पथकाचे म्हणणे आहे की मंगळवारी उधमपूर जिल्ह्यात एक खासगी मिनी बस रस्त्यावरून घसरली आणि खड्ड्यात पडली. जखमींमध्ये बहुतांश नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी आहेत.
दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. मिनी बस सलमारीहून उधमपूरच्या दिशेने जात होती. त्यानंतर दुपारी 12.30 च्या सुमारास ती कोसळली. यावेळी मदत पथक तातडीने बचाव कार्यात सहभागी झाले. 30 प्रवाशांना उधमपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यांना विशेष उपचारासाठी जम्मूला पाठवण्यात आले आहे. उधमपूरच्या उपायुक्तांनी परिस्थितीचा आढावा घेतला आहे. रूग्णांची विचारपूस करण्यासाठी ती रूग्णालयात पोहोचली.
प्राथमिक माहितीनुसार मिनी बसमध्ये सुमारे 30 ते 35 जण होते. ब्रेक फेल झाल्याने बस रस्त्याच्या कडेला जाऊन दरीत कोसळली. अपघाताचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू केला जाईल. लोकांना प्राधान्याने योग्य उपचार दिले जात आहेत. दरम्यान, भाजप आमदार पवन गुप्ता यांनी अपघाताबाबत सांगितले की, आम्हाला फोनवर घटनेची माहिती मिळाली. सुमारे 30 ते 35 जण जखमी झाले. त्यापैकी 20-22 नर्सिंगचे विद्यार्थी आहेत. तिघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. चांगले उपचार मिळावेत यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App