वृत्तसंस्था
रायपूर : CM Baghel छत्तीसगडमधील चर्चित २,१६१ कोटींच्या मद्य घोटाळ्यात अंमलबजावणी संचालनालयाचा (ईडी) तपास माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यापर्यंत पोहोचला आहे. लखमाला अटक केल्यानंतर ५३ दिवसांनी ईडीने सोमवारी बघेल आणि त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांच्या १४ ठिकाणांवर छापे मारले. सकाळी ७ वाजता तपास सुरू झाला आणि संध्याकाळी ६ वाजेपर्यंत चालू राहिला. सर्व ठिकाणाहून रोख रक्कम, दागिने आणि मालमत्तेची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.CM Baghel
ईडीने नोटा मोजण्यासाठी स्टेट बँकेकडून एक मशीनही मागवली. काही लोकांना समन्स बजावून चौकशीसाठी ईडी कार्यालयात बोलावले आहे. ईडीच्या कारवाईविरोधात विधानसभेपासून भिलाईपर्यंत निदर्शने करण्यात आली. कारवाई संपल्यानंतर माजी मुख्यमंत्री भूपेश म्हणाले, ‘ईडीने माझ्या निवासस्थानातून ३३ लाख रुपये रोख आणि १५० एकर जमिनीची कागदपत्रे काढून घेतली.’ त्यांनी महिलांची संपत्ती आणि दागिनेही नेले आहेत. माझ्याकडे सर्वांचा हिशेब आहे. सकाळी सीआरपीएफ जवानांसह ईडीचे पथक माजी मुख्यमंत्री भूपेश यांच्या भिलाई पदुम नगर येथील निवासस्थानी पोहोचले. भूपेश त्यांच्या कॅम्प ऑफिसमध्ये बसून चहा पीत होते. ईडीचे अधिकारी पोहोचताच त्यांनी घराची झडती सुरू केली. घरात, त्यांची पत्नी, सून, मुले, मुली आणि नातवंडे यांच्या खोल्यांची झडती घेण्यात आली. तेथे ठेवलेल्या वस्तू तपासल्या. दुपारी २:४७ वाजता एसबीआयकडून नोटा मोजण्याचे यंत्र मागवण्यात आले. यानंतर नोटा मोजण्यात आल्या. पथक संध्याकाळी ६ वाजता परत गेले.
येथे मारले छापे
ईडीने माजी मुख्यमंत्री भूपेश यांचे त्यांचे निकटवर्तीय काँग्रेस नेते राजेंद्र साहू, जावई मुकेश चंद्राकर, व्यापारी लक्ष्मीनारायण इत्यादींच्या घरांवर छापे टाकले. काही लोकांना समन्स बजावून चौकशीसाठी ईडी कार्यालयात बोलावले आहे. ईडीच्या कारवाईविरोधात विधानसभेपासून भिलाईपर्यंत निदर्शने करण्यात आली. कारवाई संपल्यानंतर माजी मुख्यमंत्री भूपेश म्हणाले, ‘ईडीने माझ्या निवासस्थानातून ३३ लाख रुपये रोख आणि १५० एकर जमिनीची कागदपत्रे काढून घेतली.’ त्यांनी महिलांची संपत्ती आणि दागिनेही नेले आहेत. माझ्याकडे सर्वांचा हिशेब आहे. सकाळी सीआरपीएफ जवानांसह ईडीचे पथक माजी मुख्यमंत्री भूपेश यांच्या भिलाई पदुम नगर येथील निवासस्थानी पोहोचले. भूपेश त्यांच्या कॅम्प ऑफिसमध्ये बसून चहा पीत होते. ईडीचे अधिकारी पोहोचताच त्यांनी घराची झडती सुरू केली. घरात, त्यांची पत्नी, सून, मुले, मुली आणि नातवंडे यांच्या खोल्यांची झडती घेण्यात आली. तेथे ठेवलेल्या वस्तू तपासल्या.
आमचा हस्तक्षेप नाही, काँग्रेस सरकारमध्ये अनेक घोटाळे : सीएम
भूपेश बघेल यांच्यावरील छाप्यावर छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साई म्हणाले, काँग्रेस सरकारच्या काळात अनेक घोटाळे झालेे. ईडीची चौकशी सुरू आहे. त्यात राज्य व भाजपचा हस्तक्षेप नाही. अनेक लोक आधीच तुरुंगात आहेत. बाकीचे तुरुंगात जाण्याची तयारी करत आहेत. दुसरीकडे, रायपूरमध्ये विधानसभेचे कामकाज सुरू होताच काँग्रेस आमदारांनी गोंधळ घातला. यामुळे विधानसभा अध्यक्ष रमण सिंह यांनी अनेक सदस्यांना निलंबित केले
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App