नाशिक : मुख्यमंत्र्यांची खुर्ची मनातून काही जाईना पण दोघांकडेही स्वतंत्र राजकीय कर्तृत्वाची वानवा!!, असेच राजकीय चित्र आज महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पाच्या दिवशी जनतेसमोर आले.Ajit Pawar pinched Eknath Shinde over chief ministership issue
फडणवीस सरकार मधले दुसरे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेची सुरुवातच एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्याने झाले. आम्ही टीम म्हणून एकच आहोत, पण फक्त आमच्या दोघांच्या खुर्च्यांमध्ये आदलाबदल झाली आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले. त्याबरोबरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या डावीकडे बसलेल्या अजितदादांनी शिंदेंच्या मनातलं अजून काही जाईना, असे उद्गार काढून त्यांना चिमटा काढला. यावर हे तीनही नेते हसले आणि समोरचे पत्रकारही त्यांच्यात सामील झाले.
पण असा प्रसंग काही फक्त आज अर्थसंकल्पाच्या दिवशी घडला असे नाही, तर या आधी देखील सह्याद्री अथितीगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांनी खुर्चीच्या आदलाबदलीचा उल्लेख केला होता. फडणवीस आणि माझी खुर्ची फक्त बदलली आहे. अजितदादा पर्मनंट त्याच खुर्चीवर आहेत, असे एकनाथ शिंदे म्हणाले होते. त्यावेळी तुम्हाला मुख्यमंत्र्यांची खुर्ची टिकवता आली नाही, त्याला आम्ही काय करणार??, असा टोमणा अजितदादांनी एकनाथ शिंदे यांना मारला होता. त्यावेळी देखील तिघांचा हशा पिकला होता.
पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद हे केवळ एकनाथ शिंदे यांच्याच मनात आहे आणि अजितदादांच्या ते मनात नाही अशी अजिबात स्थिती नाही. उलट देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे दोघेही मुख्यमंत्री होण्यापूर्वीपासून अजितदादांच्या मनात त्या पदाची महत्त्वाकांक्षा रुतून बसली आहे. अजितदादांचे समर्थक वारंवार अजितदादांना भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टरवर चिकटवत आले आहेत.
पण एकनाथ शिंदे असोत किंवा अजित पवार असोत, यांच्या मनातले मुख्यमंत्री पद प्रत्यक्षात अस्तित्वात यायला त्यांचे स्वतःचेच राजकीय कर्तृत्व तोकडे पडले आहे. एकनाथ शिंदे यांचा “पॉलिटिकल परफॉर्मन्स” भाजपवर अवलंबून राहिला आहे, तर अजित पवारांचा “पॉलिटिकल परफॉर्मन्स” सुरूवातीला शरद पवारांवर आणि नंतर भाजपवरच अवलंबून राहिला आहे शिंदे आणि अजितदादा या दोघांकडेही स्वतंत्र कर्तृत्वावर आणि स्वबळावर बहुमत आणण्याची क्षमता सिद्ध झालेली नाही. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाची खुर्ची मनातल्या मनात आणि फार तर एकमेकांना टोमणे मारण्यासाठी शिल्लक उरली आहे. कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद देणे किंवा घेणे हे आता कुठल्या मराठी नेत्याच्या हातात उरलेले नाही, तर ते दोन कर्तृत्ववान गुजराती नेत्यांच्या मर्जीवर अवलंबून आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App