India growth rate forecast : रेटिंग एजन्सी मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसेसने चालू आर्थिक वर्षासाठी (2021-22) भारताच्या जीडीपी वाढीचा अंदाज कमी केला आहे. फेब्रुवारीमध्ये मूडीजने आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये देशाचा विकास दर 13.7 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला होता, परंतु आता तो 9.3 टक्क्यांपर्यंत खाली आणला आहे. अशा प्रकारे यात 4.4 टक्के कपात झाली आहे. कोरोना संसर्गामुळे आर्थिक उलाढालीवर परिणाम झाला असल्याने मूडीजने हा बदल केला आहे. Moody cuts India growth rate forecast from 13.7 Percent to 9.3 Percent Amid Corona Crisis
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : रेटिंग एजन्सी मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसेसने चालू आर्थिक वर्षासाठी (2021-22) भारताच्या जीडीपी वाढीचा अंदाज कमी केला आहे. फेब्रुवारीमध्ये मूडीजने आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये देशाचा विकास दर 13.7 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला होता, परंतु आता तो 9.3 टक्क्यांपर्यंत खाली आणला आहे. अशा प्रकारे यात 4.4 टक्के कपात झाली आहे. कोरोना संसर्गामुळे आर्थिक उलाढालीवर परिणाम झाला असल्याने मुडीजने हा बदल केला आहे.
दरम्यान, या रेटिंग एजन्सीने मंगळवारी जाहीर केलेल्या आपल्या अहवालात म्हटले आहे की, कोरोनाच्या दुसर्या लाटेच्या संसर्गामुळे होणारा नकारात्मक परिणाम एप्रिल ते जूनपर्यंत राहील. यानंतर अर्थव्यवस्था पुनहा वेग धारण करील. 2021-22 च्या अर्थसंकल्पानंतर मूडीजने भारतात 10.8 टक्के वाढीचा अंदाज व्यक्त केला होता. त्यानंतर तो 13.7 टक्क्यांपर्यंत वाढवला होता आणि निगेटिव्ह आऊटलूकसोबत याची Baa3 रेटिंग कायम ठेवली होती.
मूडीजने 2022-23 या आर्थिक वर्षाचा विकास दर 6.2 टक्क्यांवरून 7.9 टक्क्यांपर्यंत वाढविला आहे. तर दुसरी महत्त्वाची रेटिंग एजन्सी स्टँडर्ड अँड पूअर्सने 8.2 ते 8.9 टक्क्यांपर्यंत वाढ होण्याचा अंदाज वर्तविला आहे. त्याच वेळी नोमुराने पूर्वी 12.6 टक्के वाढीचा अंदाज लावला होता, पण आता तो कमी करून 10.8 टक्क्यांवर आणला आहे. मूडीजने म्हटले की, कोरोना संक्रमणाची दुसरी लाट ज्या प्रकारे भारतात सुरू आहे, अल्पावधीत आर्थिक पातळीवर रिकव्हरीस वेळ लागेल, परंतु दीर्घकालीन वाढीवर नकारात्मक परिणाम होणार नाही. अर्थव्यवस्थेवर संक्रमणाचा परिणाम गेल्या वर्षाइतका घातक होणार नाही.
Moody cuts India growth rate forecast from 13.7 Percent to 9.3 Percent Amid Corona Crisis
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App