मागे कधी तरी कोण्या एका गुंतवणूक कंपनीची जाहिरात पाहिली होती विशेष लक्ष वेधणारी अशी वाटली. समजा कोणी मित्र किंवा हितचिंतकाने तुम्हाला पाचशे रुपये देऊ केले तर तुम्ही त्याचा कसा वापर करता? कदाचित एखादे लहान मूल म्हणेल की खेळणे किंवा खाऊ विकत घेण्यासाठी खर्च करेन. आणखी कोणी म्हणेल ते कपाटात ठेऊन देतील किंवा मग बँकेत जमा करतील आणि खूपच विरळा व्यक्ती कदाचित ते कुठेतरी गुंतवणूक करण्या साठी वापरेल. ५०० रुपये म्हणलं तर खूपच किरकोळ रक्कम पण तिघांच्या मते त्याचे मोल वेगवेगळे असते. खर्च करणाऱ्या व्यक्तीला खर्चालाल म्हणूयात, तसेच मग बचत करणारी व्यक्ती झाली बचतराम, आणि गुंतवणूक करण्याचा विचार करणारी व्यक्ती झाली निवेशकुमार. Investing money in proper way is important
तीन भिन्न व्यक्ती आणि वृत्ती. तिघांच्यामध्ये निवेशकुमार जो की विचार करून गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतो तो आपलं नशीब घडवू पाहतोय अर्थात श्रीमंत बनण्यासाठी. जे लोक अतिशय सहजपणे पैसे खर्च करतात फारसा विचार न करता, माझ्या मते ते एक प्रकारे लक्ष्मी अर्थात पैशाचा अनादर करत असतात आणि गरिबीकडे वाटचाल करीत असतात, मग ते कसे आणि कितीही श्रीमंत असोत गरीब होणारच ह्यात शंका नाही. कोणी कदाचित लॉटरी लागली अन् श्रीमंत झाला, असे होऊ शकते.
पण वैयक्तिक वित्त व्यवस्थापनामध्ये कोणतेही ज्ञान नाही अन् ते ज्ञान प्राप्त करण्याची इच्छा देखील नाही, ते लोक अर्थात दैव देते अन् कर्म नेते अश्याप्रकारे हाल भोगत राहणार यात शंका नाही. कारण सध्याच्या काळात पैसे मिळवणे जितके महत्वाचे आहे तितकेच महत्वाचे त्याचे नियोजन करणे फार गरजेचे आहे. जे लोक पैशांचे योग्य प्रकारे नियोजन करतात तेच सध्याच्या युगात टिकाव धरू शकतात. कारण खर्चाला सध्या अनेक पर्याय बाजारात आहेत. त्यामुळे हाती येणारा पैसा कधी खर्च होतो हे कळतही नाही. त्याचप्रमाणे पैसे वाचवण्यासाठीदेखील सध्या बाजारात अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्याचा आपल्या गरजेनुसार वापर केल्यास नक्कीचा उपयोग होतो यात शंका नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App