
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : केंद्र सरकारने अल्पबचत योजनांच्या व्याजदराला कपातीचा निर्णय मागे घेतल्याने सर्वसामान्य गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. याबाबत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ट्वीट करून माहिती दिली. सरकारने नव्या आर्थिक वर्षाच्या (२०२१-२२) पहिल्या तिमाहीसाठी अल्पबचत योजनांच्या व्याजदरात मोठी कपात केली होती. या योजनांच्या व्याजदरात ०.५० टक्के ते ०.९० टक्के इतकी मोठी कपात केल्याने सर्वसामान्य गुंतवणूकदारांना मोठी झळ बसणार होती. Govt slashed interest rates of small saving schemes
Interest rates of small savings schemes of GoI shall continue to be at the rates which existed in the last quarter of 2020-2021, ie, rates that prevailed as of March 2021.
Orders issued by oversight shall be withdrawn. @FinMinIndia @PIB_India— Nirmala Sitharaman (Modi Ka Parivar) (@nsitharaman) April 1, 2021
…तर एवढी झाली असती कपात
अल्पबचत योजनांमध्ये सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ), राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (एनएससी), किसान विकास पत्र (केव्हीपी), मासिक प्राप्ती योजना (एमआयएस), मुदत ठेव (टीडी), आवर्ती ठेव (आरडी), ज्येष्ठ नागरिक बचत योजना (एससीएसएस), सुकन्या समृद्धी खाते योजना (एसएसएवाय), बचत खाते (एसबी) आदी योजनांचा समावेश आहे. या योजना प्रामुख्याने पोस्टाच्या; तसेच निवडक बँकांच्या माध्यमातून राबविल्या जातात.
सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याच्या ‘पीपीएफ’, ‘केव्हीपी’ आणि ‘एसएसएवाय’ या योजनांचे व्याजदर ०.७० टक्क्यांनी खाली आणण्यात येणार होते. आरडी आणि एसबी खात्यावरील व्याजदर ०.५० टक्क्यांनी घटविण्यात येणार होता. याचा मोठा फटका व्याजावर अवलंबून असणाऱ्या सर्वसामान्य गुंतवणूकदारांना बसला असता. परंतु केंद्राने आता हा निर्णय मागे घेतला आहे.
Govt slashed interest rates of small saving schemes
Array