विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यात कोरोना साथीच्या संसर्गाची दुसरी लाट रोखण्यासाठी मंत्रालयात येणाऱ्या अभ्यागतांना आरटीपीसीआर चाचणी सक्तीची केली जाणार आहे.RTPCR test requires for entry in mantralaya
कोरोना रोगाची दुसऱ्या लाटेतील ही साखळी तोडण्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार नेटाने प्रयत्न करीत असले तरी या साथीचे फार मोठे आव्हान उभे राहिले आहे.यामुळे सरकारने कडक पावले उचलत काही निर्णय घेतले आहेत.
मंत्रालयात काम करणारे अधिकारी-कर्मचारी,मंत्रिआस्थापनावरील अधिकारी-कर्मचारी यांना ही चाचणी आवश्यवक नाही. विधीमंडळाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या दरम्यान अशाप्रकारची चाचणी सक्तीची केली होती.मंत्रालयात विवीध कामासाठी येणाऱ्या अभ्यागतांना आळा बसावा
यासाठी त्यांना आरटीपीआर ही कोरोनाचा संसर्ग झाला अथवा नाही हे ओळखण्याची चाचणी यापुढे सक्तीची केली आहे. वैयक्तिक अथवा सार्वजनिक कामासाठी अभ्यागत मंत्रालयात भेट देत असतात. यावर यापुढे निर्बंध येणार आहेत. जेणेकरून दुसऱ्या लाटेतील कोरोना साथीची साखळी तोडण्यास मदत होईल.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App