आपल्या पोर्टफोलिओतील खराब कामगिरी करणारे म्युच्युअल फंड तसेच ठेवून चांगली कामगिरी करणारे म्युच्युअल फंड विकण्याचा मोह गुंतवणूकदारांना होऊ शकतो. उदाहरणार्थ, गेल्या दहा वर्षांत सरासरी १८ टक्के वार्षिक परतावा देणारा एक फंड आणि फक्त ३ टक्के वार्षिक परतावा देणारा दुसरा म्युच्युअल फंड असे दोन फंड आपल्या पोर्टफोलिओमध्ये असतील, तर त्यापैकी चांगली कामगिरी करणारा फंड विकून त्यावरील फायदा पदरात पाडून घ्यावा, असा विचार मनात येऊ शकतो. Avoid lump sum investments
खरे तर गेल्या दहा वर्षांत चांगली कामगिरी करू न शकणारा म्युच्युअल फंड विकून टाकला पाहिजे आणि सातत्याने चांगली कामगिरी करणारा म्युच्युअल फंड न विकता त्यात अधिक गुंतवणूक करत राहिली पाहिजे. शेअर बाजारातील निफ्टी आणि सेन्सेक्स या दोन्ही निर्देशांकाचे पीई गुणोत्तर सर्वोच्च पातळीवर पोचले आहे. बहुतेक सर्व इक्विटी म्युच्युअल फंडांचे बाजारभाव (एनएव्ही) देखील सर्वोच्च पातळीच्या आसपास पोचले आहेत. अशा वेळी कोणत्याही इक्विटी म्युच्युअल फंडात एकरकमी गुंतवणूक करण्याऐवजी ती रक्कम विभागून टप्प्याटप्प्याने गुंतवली पाहिजे.
उदाहरणार्थ, एका उत्तम फंडात एकरकमी पाच लाख रुपये गुंतविण्याऐवजी त्यातील एक लाख रुपये एकरकमी गुंतवून, त्याच फंडात दरमहा २५ हजार रुपयांची एक वर्ष कालावधीची ‘एसआयपी’ सुरु करावी. असे एकूण चार लाख रुपये गुंतवणूक करून काही कारणाने बाजार जर वेगाने कोसळला, तर खालच्या पातळीवर खरेदीसाठी एक लाख रुपये बाजूला ठेवावेत.
शेअर बाजाराच्या निर्देशांकातील कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्या ‘इंडेक्स फंडां’वर लक्ष ठेवावे. दोलायमान स्थितीत असलेला निर्देशांक दोन-तीन टक्के वर-खाली होताना दिसत आहे. अशा वेळी ‘इंडेक्स फंडा’त खालच्या पातळीवर एकरकमी गुंतवणुकीची संधी निर्माण होते. अर्थात या जोडीला अशा फंडात नियमित ‘एसआयपी’ सुरु ठेवावी.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App