शतायुषी लोकांच्या जगभरातील ब्लू झोन्सची कथा

जगात शतायुषी लोकांची काही ब्लू झोन आहेत. त्याची माहिती हवीच. इटलीजवळच्या भूमध्य समुद्रात सार्डिनिया बेटावर शंभरी ओलांडलेले सरासरी 20 नागरिक असतातच; पण नव्वदीपुढील लोकांची संख्याही जास्त असते. The story of the Blue Zones around the world for centuries

हे बेट भौगोलिकदृष्ट्या एकाकी पडलेलं आहे. येथे बाहेरच्या लोकांची ये-जा नसते. स्थानिक लोकांचा कल आरामात व मजेत जीवन व्यतीत करण्याकडे असतो. इथं कुटुंबप्रधान संस्कृती असून तीन पिढ्या एका घरात वावरताना दिसतात. बरेचसे लोक मेंढपाळ असल्यामुळे रोज 20 ते 25 कि.मी. चालतात. त्यांच्या रंगगुणसूत्रात एम-26 नावाचे जनुक आहे. त्यात त्यांच्या दीर्घायुष्याचं रहस्य दडलेलंय.

शेळीचे दूध, चीज, भाजीपाला, चपटा पाव आणि रेड वाईन असा त्यांचा साधा आहार आहे. जपानच्या ओकिनावा भाग ब्ल्यू झोनमध्ये येतो. येथील रिकयु बेटावर प्रति एक लाख नागरिकांमधील सत्तर शतायुषी आहेत. यांचा आहार कमी कॅलरीचा; पण पोटभरू असतो.

भात कमी; पण भाजीपाला जास्त. त्यात रताळी, कोबी, गाजर, कच्ची पपई आणि कारली भरपूर असतात तसेच सोयाबीनचे दूध, दही, चीज असते. त्यांना ‘ग्रीन टी’ पिणे आवडते. इथं हृदयविकार आणि कर्करोग आढळत नाही. तिसरा ब्ल्यू झोन मध्य अमेरिकेतील कोस्टा-रिका देशात आहे. येथील निकोया बेटावर 250 लोकातील एक शतायुषी असतो! काहींना खापर पणतू आहेत. येथील पाण्यात कॅल्शियम असते. भरपूर सूर्यप्रकाश असल्याने लोकांना डी जीवनसत्त्व मिळते. यांची हाडे बळकट असतात.

या लोकांच्या आहारात नेहमी भात, मक्यारची चपाती, पावटा, मटार, डबल बी, घेवडा, सॅलड आणि फळे असतात. यांना समाधानी आणि सात्विक जीवनाची ओढ आहे. चौथा ब्ल्यू झोन आहे लोमा लिंडा, येथील चार हजार नागरिकांमधील एक शतायुषी असतो. हे लोक शाकाहारी असून धूम्रपान आणि मद्यपान करत नाहीत. ते मोकळ्या हवेत नियमित साधे व्यायाम करतात आणि ते बॉडी मास इंडेक्स 20 ते 25 राखतात.

इकारिया (ग्रीस) येथील पाचव्या ब्ल्यू झोनमधील 35 टक्के नागरिक नव्वदी सहज गाठतात. हे लोक एकत्र येऊन रात्री गप्पा मारतात; पण दुपारी झोप भरून काढतात. जगातील शतायुषी अन्न हेच औषध मानतात. हलके व्यायाम नियमित करतात. त्यांचं जीवन सलोख्याचं साधं खेळीमेळीचे आहे; म्हणूनच ते समृद्ध-समाधानी जीवन जगतात.

The story of the Blue Zones around the world for centuries