विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – ज्वालामुखी व पृथ्वी यांचा जवळचा संबंध असून वसुंधरेवरील तापमान स्थिर करण्यात ज्वालामुखींची महत्त्वाची भूमिका बजावली आहे, असे निदर्शनास आले आहे. साऊथम्पटन विद्यापीठ (ब्रिटन), सिडनी विद्यापीठ (ऑस्ट्रेलिया), ओटावा विद्यापीठ (अमेरिका) आणि लीड्स विद्यापीठ (ब्रिटन) या विद्यापीठांमधील शास्त्रज्ञांच्या गटाने हा अभ्यास केला आहे. यासंबंधाचा शोध निबंध ‘नेचर जिओसायन्स’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे.Due to Volcano temperature on earth remains cool
या यंत्रणेद्वारे वातावरणातील ‘सीओ२’ आणि भूवैज्ञानिक वेळेनुसार वैश्वि क तापमानाची पातळी नियमित राखण्यास मदत झाली, असे या लेखात नमूद केले आहे. मशिन लर्निंग अल्गोरिदम आणि पृथ्वीच्या ‘प्लेट टिटोनिक’ पुर्नउभारणीच्या मदतीने होणाऱ्या संशोधनाला शास्त्रज्ञांनी ‘अर्थ नेटवर्क’ असे नाव दिले होते. याच्या मदतीने काळाच्या ओघात विकसित झालेली पृथ्वीची व्यवस्था आणि प्रक्रिया यातील प्रमुख परस्परसंबंधाचा अभ्यास त्यांनी केला.
गेल्या ४० कोटी वर्षांत पृथ्वी स्थिर होण्याची प्रक्रिया, वातावरण आणि सागर याविषयीचा अभ्यास शास्त्रज्ञांनी केला. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील नैसर्गिक अडथळे आणि खडकांचे विघटन करणाऱ्या रासायनिक हवामान प्रक्रिया यावर अभ्यासात भर दिला आहे.
या प्रक्रियेतून मॅग्नेशिअम आणि कॅल्शिअम यांसारखी घटकांची निर्मिती झाली. नद्यांमार्फत हे घटक समुद्राला जाऊन मिळाले. तेथे पाण्यात त्यांचे खनिजात रूपांतर होऊन ‘सीओ२’ (कार्बन डाय ऑक्साईड) तयार झाला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App