केरळ ज्वालामुखीच्या तोंडावर, चीनी व्हायरसचा उद्रेक वाढण्याची पर्यटन मंत्र्यांनाच भीती

केरळने चीनी व्हायरसशी दोन हात करून त्यावर मात केल्याचे मॉडेल आतापर्यंत देशात आदर्श मानले जात होते. मात्र, ही वस्तुस्थिती नसून केरळातही सारे काही आलबेल नाही. केरळातली महत्वाचा तिरुअनंतपुरम जिल्हा सक्रीय ज्वालामुखीच्या तोंडावर असून या ठिकाणी समूह संसर्ग पसरणार नसल्याची शाश्वती देता येत नाही, अशी कबुलीच केरळचे पर्यटन मंत्री कडकंपल्ली सुरेंद्रन यांनी दिली आहे.


वृत्तसंस्था

तिरुवनंतपुरम : केरळने चीनी व्हायरसशी दोन हात करून त्यावर मात केल्याचे मॉडेल आतापर्यंत देशात आदर्श मानले जात होते. मात्र, ही वस्तुस्थिती नसून केरळातही सारे काही आलबेल नाही. केरळातली महत्वाचा तिरुअनंतपुरम जिल्हा सक्रीय ज्वालामुखीच्या तोंडावर असून या ठिकाणी समूह संसर्ग पसरणार नसल्याची शाश्वती देता येत नाही, अशी कबुलीच केरळचे पर्यटन मंत्री कडकंपल्ली सुरेंद्रन यांनी दिली आहे.

केरळच्या आरोग्य मंत्री शैलजा टिचर आणि येथील प्रशासनाच्या प्रयत्नामुळे चीनी व्हायरसचा यशस्वी मुकाबला केल्याचे म्हटले जात होते. मात्र, येथील चाचण्यांची संख्या कमी होती. आता चाचण्या वाढल्यावर रुग्णांची संख्या वाढू लागली आहे.

सुरेंद्रन म्हणाले, आम्ही एका सक्रिय ज्वालामुखीच्या शिखरावर बसलो आहोत जे कधीही फुटू शकेल. आजपर्यंत तरी समूह संसर्गाच्या टप्यावर आपण गेलो नाही. पण याचा अर्थ असा नाही की ते होणार नाही. कंटेनमेंट झोनवरील निर्बंध अधिक कडक केले जातील आणि अन्नपुरवठा करणाऱ्या मुलांची चाचणी घेण्यात येईल. राज्य सरकारने विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी जिल्ह्यात आणखी अँटीजेन चाचण्या घेण्याचा निर्णय घेतला आहे.

तिरुवनंतरपुरम शहरात नुकताच एक अन्नपुरवठा करणारा डिलिव्हरी बॉय आणि  एक पोलीस कर्मचारी बाधित आढळून आला होता. त्याचबरोबर चीनी व्हायरसने बाधित असलेले दोन आरोपी पळून गेले आहेत. केरळमध्ये रविवारी चीनी व्हायरसने बाधित झालेल्यांचा आकडा पाच हजारांवर पोहोचला आहे. एकाच दिवशी २४० नवे रुग्ण सापडले. केरळची राजधानी असलेल्या तिरुअनंतपूरम जिल्ह्यातील रुग्णसंख्या ७७ वरून १०९ वर पोहोचली आहे. १३ हजारांवर लोक आयसोलेशन सेंटरमध्ये आहेत.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*