आत्मनिर्भर भारत चीनी कंपन्यांना देणार ५० हजार कोटींचा फटका, देशांतर्गत उद्योगांच्या हातात येणार दोन लाख कोटी रुपये

प्रत्येक क्षेत्रात देशाला आत्मनिर्भर बनविण्यासाठी जनतेने व्यापक मोहिमेत सहभाग घ्यावा, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला भारतीय नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. सणासुदीच्या काळात चीनी वस्तुंना नागरिक आणि व्यापारी नाकारत आहेत. यामुळे येत्या काही काळात चीनी कंपन्यांना सुमारे 50 हजार कोटी रुपयांचा फटका बसू शकतो, असा अंदाज कॉन्फडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्सने वर्तविला आहे.Due to Self-reliant India Chinese companies will loose Rs 50,000 crorein Diwali , Rs 2 lakh crore will go to domestic industries


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : प्रत्येक क्षेत्रात देशाला आत्मनिर्भर बनविण्यासाठी जनतेने व्यापक मोहिमेत सहभाग घ्यावा, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला भारतीय नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. सणासुदीच्या काळात चीनी वस्तुंना नागरिक आणि व्यापारी नाकारत आहेत. यामुळे येत्या काही काळात चीनी कंपन्यांना सुमारे 50 हजार कोटी रुपयांचा फटका बसू शकतो, असा अंदाज कॉन्फडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्सने वर्तविला आहे.

दिवाळीपूर्व खरेदीमध्ये देशात बनविलेल्या म्हणजेच मेक इन इंडिया आणि घरगुती वस्तुंच्या खरेदीकडे नागरिकांचा कल आहे, असे सीएआयटीचे महासचिव प्रवीण खंडेलवाल यांनी एका निवेदनाद्वारे सांगितले आहे. भारतासह विविध शेजारी देशांत मोठ्या प्रमाणावर वस्तू विकण्याचे धोरण चीनने गेल्या काही वषार्पासून अवलंबलेले आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विदेशी वस्तुंचा वापर न करता देशात बनलेल्या वस्तू वापरुन आत्मनिर्भर भारत मोहिमेत आपल्या परिने योगदान देण्याचे आवाहन केले होते. या मोहिमेचे यश आता दिसून येऊ लागले असल्याचे मानले जात आहे. चीनी वस्तुंवर अघोषित बहिष्कार टाकलेला असल्याने त्याचा थेट फायदा देशातील उद्योग-धंद्यांना होणार आहे, असे खंडेलवाल यांनी सांगितले.



दिवाळीच्या काळात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. चीनी वस्तुंवरील अघोषित बहिष्कारामुळे देशातंर्गत उद्योगांच्या हाती सुमारे दोन लाख कोटी रुपये येण्याचा अंदाज खंडेलवाल यांनी व्यक्त केला आहे. चीनकडून सुरु असलेल्या आगळिकीच्या पार्श्वभूमीवर सीएआयटीने गतवर्षी चीनी वस्तुंवर बहिष्कार घालण्याची हाक दिली होती. मात्र यंदा त्यापेक्षा मोठा फटका चीनी वस्तुंना बसणार आहे, कारण लोक स्वत:हून चीनी वस्तुंचा आग्रह सोडत असल्याचे दिसत आहे.

फटाके असोत वा लायटिंगच्या माळा असोत, चीनी वस्तुंकडे लोकांचा कल कमी आहे. दुसरीकडे व्यापारीही जाणीवपूर्वकपणे चीनी माल टाळत आहेत. चीनी कंपन्यांकडून वस्तुंवर घातक रसायने लावल्या जात असल्याच्या मध्यंतरी बातम्या आल्या होत्या. केवळ दिवाळीच नाही तर चालूवर्षी जवळपास प्रत्येक सणावेळी चीनी वस्तुंची मागणी लक्षणीयरित्या कमी झाल्याचे आम्ही केलेल्या पाहणीत दिसून आले आहे. राखी पोणिंर्मा, गणेशोत्सवाच्या काळातही देशात बनलेल्या वस्तुंना लोकांनी प्राधान्य दिल्याचे दिसून आले होते, असेही खंडेलवाल यांनी सांगितले.

Due to Self-reliant India Chinese companies will loose Rs 50,000 crorein Diwali , Rs 2 lakh crore will go to domestic industries

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात