इराणहून आलेल्या बोटीतून ४२५ कोटींचे ड्रग्ज जप्त; गुजरात एटीएस, कोस्टगार्डची संयुक्त कारवाई

वृत्तसंस्था

अहमदाबाद : इराणहून गुजरातमध्ये आलेली संशयास्पद बोट पकडण्यात आली असून या बोटीमधील तब्बल 425 कोटींचे ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. गुजरात एटीएस आणि कोस्टगार्डच्या अधिकाऱ्यांनी ही संयुक्त कारवाई केली आहे. या बोटीतील 5 जणांना सुद्धा अटक करण्यात आली आहे.Drugs worth 425 crore seized from a boat from Iran

425 कोटी किंमतीचे 61 किलो हेरॉइन

गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील ओखाच्या समुद्रकिनाऱ्याजवळ एटीएस आणि कोस्टगार्डने इराणहून आलेली एक संशयास्पद बोट पकडली आहे. या बोटीची तपासणी केली असता त्यामध्ये 425 कोटी किंमतीचे 61 किलो हेरॉइन आढळून आले. या बोटीतून 5 जणांना अटक करण्यात आली आहे.



एका खबऱ्याने गुजरात एटीएसला माहिती दिल्याप्रमाणे शहरात मोठ्या प्रमाणात हेरॉइन येणार होते. ते आल्याबरोबर त्या माहितीनुसार ही संयुक्तपणे कारवाई करण्यात आली आहे. ओखा समुद्रकिनाऱ्यापासून तब्बल 340 किलोमीटर दूर अंतरावर एक संशयित बोट आढळून आली. गस्तीवर असलेल्या कोस्टगार्डच्या अधिकाऱ्यांनी बोटीला थांबण्याची सूचना केली. पण, या बोटीने तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पाठलाग करून या बोटीला पकडले. त्यात आढळलेली ड्रग्स वजनाने 61 किलो भरली. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात 425 कोटी रूपये किंमत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Drugs worth 425 crore seized from a boat from Iran

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात