विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : आज प्या डबल चहा, हे वाचुन आश्चर्य वाटले ना ! पण, कारण तसे आहे. कारण आज आंतरराष्ट्रीय चहा दिवस आहे. अर्थात संयुक्त राष्ट्र संघाने २१ मे हा आंतरराष्ट्रीय चहा दिवस जाहीर केला असला तरी यापूर्वी १५ डिसेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय चहा दिवस म्हणून साजरा केला जात होता. त्यामुळे डबल चहा पिऊन दिवसाचा आनंद साजरा करावा. तसेच आपल्या कुटुंबियासमवेत आपल्या हिताबाबत ‘चाय पे चर्चा’ करावी. Drink double tea today; People with family Definitely do ‘Chai Pe Charcha’ for your benefit
भारतीय संस्कृतीत प्रत्येक महिन्यात सण आणि उत्सव असतात. चहा हा भारतीय जीवन शैलीचा एक भाग आहे. सकाळी उठल्यावर चहा शिवाय भरतीयांचे पान हलत नाही. भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लहानपणी रेल्वे स्टेशनवर चहा विकला होता. एक चहावाला देशाचा पंतप्रधान बनला, हे भारतीय लोकशाहीचे मोठे यश आहे. गेल्या ७ वर्षात मोदी यांनी देशात विकासाची चौफेर गंगा आणली आहे. भव्य दिव्य प्रकल्प साकारले. देशाला एक बळकट सरकार केंद्रात दिले आहे. चीन आणि पाकिस्तान यांचे दात घशात घातले आहे. सीमारेषा हि तलवारीच्या टोकाने आखली जाते, याची प्रचिती जगाला दिली आहे. लष्कराला त्यांच्या सामर्थ्याचा वापर करण्याची पुरेपूर सूट दिली आहे. त्यामुळे निधड्या छातीचे जवान शत्रूला धूळ चाटण्यात यशस्वी ठरले आहेत.
भारताची मोठी प्रगती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली होत आहे. जगातील सर्वात उंच पुतळा म्हणजेच सरदार वल्लभभाई पटेल यांचा उभारून देशाची शान वाढविली. जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी यांच्या नावाचे आहे. अयोध्येत राम मंदिराचे काम वेगाने सुरु आहे. काशी विश्वनाथ मंदिराचा आणि परिसराचा कायापालट जीर्णोद्धार केला. आद्य शंकराचार्य यांच्या काश्मीरमधील समाधीचा जिर्णीद्धार नुकताच पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाला. भारतीय संस्कृती आणि वैभवात भर टाकण्याचे बहुमोल कार्य गेल्या सात वर्षात झाले.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या हिंदुत्वावर देशाची वाटचाल सुरु असल्याचे यानिमिताने स्पष्ट होत आहे. भारतात राहणारी व्यक्ती ही मूळची हिंदू आहे. ज्या व्यक्तीची पितृभूमी, मातृभूमी आणि पुण्यभूमी भारत आहे तो या देशाचा नागरिक आहे, अशी हिंदुत्वाची व्याख्या आहे. केंद्रात बहुमताचे एक पक्षीय भाजपचे सरकार आल्यामुळे विविध निर्णय घेणे शक्य झाले आहे. खिचडी, आघाडी सरकारमुळे देशाचे वाटोळे होते, हे मोदी सरकार येण्यापूर्वी जनतेने पहिले आहे. महाराष्ट्रात आघाडी सरकारमुळे राज्याची वाट कशी लागली आहे, हे जनता आता पाहतच आहे. दररोज नवी नवीन भ्रष्टाचार उघड होत आहेत. आघाडी सरकारमधील मंत्र्यात ताळमेळ नाही. एकमेकावर आणि विरोधकावर टीका, कुरघोड्या करण्यात सत्ताधारी मंडळी व्यग्र आहेत.
राज्यात एसटी कर्मचारी संपावर आहेत. दररोज प्रवास कसा करायचा याची जनतेला चिंता आहेत. ना एसटी कर्मचाऱ्यांची, ना प्रवाशांची चिंता सरकारला आहे. दुसरीकडे कोट्यवधींचा महसूल सरकारचा बुडत आहे. त्याकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे. आता राज्यातील जनतेने या मुद्यावर आणि केंद्रातील मोदी सरकारच्या विकासात्मक कार्याची चहा दिवसानिमित ‘चाय पे चर्चा’ कुटुंबियासमवेत नक्कीच करावी. चर्चेत जनतेने स्वतःचे हित नेमका कोणता पक्ष पाहतो, याचा साकल्याने विचार करावा.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App