वृत्तसंस्था
हैदराबाद : Naxalite Sujata २०१० च्या दशकातला सशस्त्र नक्षल चळवळीचा नेता दिवंगत माल्लोजुला कोटेश्वर राव ऊर्फ किशनजी याची पत्नी पोथुला पद्मावती उर्फ सुजाताने (६२) हिने तेलंगण पोलिसांपुढे शरण आली. ४३ वर्षांपासून नक्षलसंघटनेत सक्रिय असलेल्या सुजातावर विविध राज्यात दोन कोटींहून अधिक बक्षीस होते.Naxalite Sujata
तेलंगणतील जोगुलांबा गाडवाल जिल्ह्यातील पेंचकलपेठ येथील रहिवासी सुजाताकडे नक्षल्यांच्या केंद्रीय समितीचे सदस्यत्व, दक्षिण विभागाचे सचिवपद व दंडकारण्य विभागाच्या जनता सरकारचा प्रभार होता. तिचे वडील पोस्टमन होते. चार भावंडांमध्ये एकुलती एक असलेली सुजाता १९८२ साली नक्षल चळवळीत सहभागी झाली. तिची तीन चुलत भावंडेदेखील नक्षल चळवळीत होते. तिने १९८४ साली नक्षल नेता माल्लोजुला कोटेश्वर राव ऊर्फ किशनजीसोबत लग्नगाठ बांधली. त्यांना एक मुलगी आहे.Naxalite Sujata
२०७ जवानांच्या हत्येत सुजाताचा सहभाग
६३ नागरिकांसह २०७ जवानांच्या हत्येत सहभागी सुजाताने आपल्या कार्यकाळात अनेक हिंसक घटना घडवून आणल्या. यात ६३ राजकीय व सामान्य नागरिकांसह २०७ जवानांना जीव गमवावा लागला होता. मधल्या काही काळापासून आजारी असल्यामुळे सुजाताने १३ सप्टेंबर रोजी आत्मसमर्पणाचा निर्णय घेतल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. गेल्या वर्षभरात तेलंगणमध्ये ४०४ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App