वृत्तसंस्था
नवी दिल्ली : द्रौपदी मुर्मू आज देशाच्या 15व्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्याकडून त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली जाईल. यासह त्या पहिल्या आदिवासी आणि दुसऱ्या महिला राष्ट्रपती होण्याचा इतिहास रचणार आहेत. त्यांच्या आधी २००७ मध्ये प्रतिभाताई पाटील या पहिल्या महिला राष्ट्रपती होत्या. मुर्मूंचे कुटुंबीय ओडिशातील रायरंगपूरहून दिल्लीत पोहोचले आहेत. मुर्मूंची वहिनी सुकरी टुडू यांनी त्यांच्यासाठी संथाली साडी आणली आहे. मुर्मू ही साडी परिधान करून शपथ घेऊ शकतात. पूर्व भारतात संथाली साडी ही सणाच्या दिवशी परिधान करण्याची परंपरा आहे. या सोहळ्यात संथाली आदिवासी संस्कृतीची झलक दिसू शकते.Draupadi Murmu will be administered the oath of office by the Chief Justice of India today
असा होईल सोहळा
सकाळी ९.२५ वाजता मुर्मू राष्ट्रपती भवनात पोहोचतील. गार्ड ऑफ ऑनर देण्यात येईल. यानंतर १०.१५ वाजता सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा शपथ देतील. बरोबर ११.०० वाजता मावळत्या राष्ट्रपतींना राष्ट्रपती भवनातून निरोप देण्यात येईल.
कोविंद यांचे अखेरचे संबोधन
रामनाथ कोविंद यांनी काल राष्ट्रपती म्हणून देशाला संबोधित केले. ते म्हणाले, गावातील साधारण कुटुंबातून आलेले रामनाथ कोविंद देशवासीयांना संबोधित करत आहे, यासाठी मी देशाच्या जागरूक लोकशाही व्यवस्थेच्या शक्तीला नमन करतो. माझा ठाम विश्वास आहे की, 21वे शतक भारताचे व्हावे म्हणून आपला देश सक्षम होत आहे.
सलग 10व्यांदा 25 जुलैला शपथ
मुर्मू या 25 जुलैला शपथ घेणाऱ्या दहाव्या राष्ट्रपती असतील. १९७७ नंतर प्रत्येक वेळी राष्ट्रपतींचा शपथविधी सोहळा २५ जुलै रोजी होत आहे. देशाचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी २६ जानेवारी १९५० रोजी शपथ घेतली. त्याच दिवशी भारत प्रजासत्ताक झाला. दुसऱ्यांदा निवडणूक जिंकल्यानंतर ते मे १९६२ पर्यंत या पदावर राहिले. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी १२ मे १९६२ रोजी शपथ घेतली आणि १३ मे १९६७ पर्यंत पदावर राहिले.
झाकीर हुसेन आणि फखरुद्दीन अली अहमद यांचे निधन झाल्याने त्यांचा कार्यकाळ पूर्ण होऊ शकला नाही. सहावे राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी यांनी २५ जुलै १९७७ रोजी शपथ घेतली. त्यानंतर २५ जुलै रोजी ग्यानी झेल सिंग, आर वेंकटरामन, शंकर दयाळ शर्मा, केआर नारायणन, एपीजे अब्दुल कलाम, प्रतिभा पाटील, प्रणब मुखर्जी आणि रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपती पदाची शपथ घेतली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App