वृत्तसंस्था
नवी दिल्ली – कोणत्याही धार्मिक प्रचारासाठी आणि कोणत्याही धर्माच्या बदनामीसाठी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या प्लॅटफॉर्मचा गैरवापर करू नये, अशा शब्दांत दिल्ली कोर्टाने आयएमएचे अध्यक्ष डॉ. जॉनरोज ऑस्टिन जयलाल यांना सुनावले आहे. Don’t use IMA platform to propagate religion: Delhi court
जयलाल हे आयएमच्या प्लॅटफॉर्मचा वापर ख्रिश्चन धर्माच्या प्रसारासाठी करतात आणि हिंदू धर्म, आयुर्वेदाची ते बदनामी करतात, असा आरोप करणारी याचिका रोहित झा यांनी केली होती. त्यावर निर्णय देताना दिल्ली कोर्टाच्या न्यायाधीशांनी भारताची राज्यघटना धर्मनिरपेक्षतेवर आधारित आहे. तेथे कोणा धर्माची बदनामी करता येणार नाही, असे सुनावले. यावेळी न्यायाधीश गोयल यांनी कवि महंमद इक्बाल यांच्या मजहब नही सिखाता आपस में बैर रखना या काव्यपंक्तीही उधृत केल्या. यातले हिंदी है हम हे शब्द आपली ओळख हिंदूस्तानी अशी करून देतात, याकडे न्यायाधीशांनी लक्ष वेधले. धर्म, जात, पंथ, रंग यांच्या पलिकडची ही संकल्पना असल्याचे त्यांनी नमूद केले.
जयलाल यांनी धार्मिक प्रचाराच्या फंदात पडू नये. तसेच कोणत्याही धर्माची अथवा औषधपध्दतीची बदनामी करू नये. शस्त्रक्रिया आणि ऍलोपथी ही पाश्चात्यांची देणगी असल्याचा युक्तिवादही खोटा आहे. कारण भारतात ज्याला दैवताचे स्थान आहे, अशा सुश्रूत ऋषींना शस्त्रक्रियेचे जनक मानण्यात येते आणि शस्त्रक्रिया हा ऍलोपथीचा एक महत्त्वाचा भाग आहे, या मुद्द्याकडे न्यायाधीशांनी लक्ष वेधले.
Don't Use IMA Platform for Promoting Religion : Delhi Court While Reprimanding IMA President John Austin on Complaint to Convert to Christianity — Megh Updates 🚨™ (@MeghUpdates) June 5, 2021
Don't Use IMA Platform for Promoting Religion : Delhi Court While Reprimanding IMA President John Austin on Complaint to Convert to Christianity
— Megh Updates 🚨™ (@MeghUpdates) June 5, 2021
डॉ. जयलाल यांची डिसेंबर २०२० मध्ये आयएमएच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची भाषणे, लेख, कार्यपध्दती लक्षात घेतली तर ते ख्रिश्चन धर्माच्या प्रसारात गुंतले असल्याचे लक्षात येते. ते त्याच बरोबर आयुर्वेद आणि पर्यायाने हिंदू धर्माची देखील बदनामी करतात. त्यांना न्यायालयाने तसे करण्यापासून रोखावे, असा अर्ज रोहित झा यांनी केला होता. तो अर्ज न्यायालयाने फेटाळला पण त्याचवेळी डॉ. जयलाल यांना धार्मिक प्रसार आणि एखाद्या धर्माची, आयुर्वेदाची बदनामी करता येणार नाही, असे स्पष्ट शब्दांमध्ये सुनावले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App