विशेष प्रतिनिधी
मुंबई : लता दीदींच्या कुटुंबियांच्या वतीने विनंती आहे अफवा पसरवू नका. त्या उपचारांना चांगला प्रतिसाद देत असून देवाच्या आशीवार्दाने लवकरच बºया होऊन घरी परतणार आहेत. अफवा टाळा आणि लता दीदींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत राहा, अशी विनंती केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री स्मृति इराणी यांनी केली आहे.Don’t spread rumors about Lata Didi’s health, Smriti Irani appealed on behalf of the family
कोविड पॉझिटिव्ह आढळल्यानंतर लता मंगेशकर यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचे लाखो चाहते त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हाव्यात यासाठी सतत प्रार्थना करत आहेत. लता मंगेशकर यांच्या प्रकृतीबाबत सातत्याने अपडेट्स दिले जात आहेत.
लता मंगेशकर यांच्या कुटुंबियांतर्फे एक निवेदन जारी केले असून डॉक्टरांचे एक पथक त्यांची सतत काळजी घेत आहे, असे म्हटले आहे. यासोबतच केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनीही ट्विट करून कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरवू नका असे म्हटले आहे.
स्मृती इराणी यांनी लता मंगेशकर यांच्या डॉक्टरांच्या निवेदनाची एक पोस्ट शेअर केली आहे.शुक्रवारी रात्री एक निवेदन जारी करून लता मंगेशकर यांच्या कुटुंबियांना लोकांना आवाहन केले की, खोट्या बातम्यांना पसरवू नका.
लता दीदी सध्या आयसीयूमध्ये असून डॉ प्रतित समदानी त्यांच्या डॉक्टरांच्या टीमसह त्यांच्यावर उपचार करत आहेत. लता दीदींच्या कुटुंबाला आणि डॉक्टरांनाही वेळ देण्याची गरज आहे. खोट्या बातम्या प्रसारित होताना पाहून खूप त्रास होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App