विशेष प्रतिनिधी
पल्लकड – केरळमधील पल्लकड जिल्ह्यातील माथुर गावाच्या ग्रामपंचायतीने त्यांच्या कार्यालय परिसरात ‘सर’ व ‘मॅडम’ या शब्दांचा वापर करण्यावर प्रतिबंध केला आहे. Don’t call sir, mam to govt. officials
सामान्य नागरिक, लोकप्रतिनिधी आणि सरकारी अधिकारी-कर्मचारी यांच्यातील सीमारेषा पुसून टाकण्यासाठी वसातहकाळातील ‘सर’ आणि ‘मॅडम’ या सन्मानीय संबोधनांवर बंदी घालण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने एकमताने घेतला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीची युवकाला आस; श्रीनगर ते दिल्ली असा ८५० किलोमीटरचा करणार चालत प्रवास
तेथील अधिकाऱ्यांना नावाने किंवा त्यांच्या पदाने संबोधित करावे, अशी सूचना केली आहे. अशा संबोधनांचा वापर थांबविणारी माथुर ग्रामपंचायत ही देशातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.
सरकारी कार्यालयात गेल्यावर तेथील अधिकारी, कर्मचाऱ्यांना ‘सर’ किंवा ‘मॅडम’ असे संबोधन वापरणे बहुतेकांच्या सवयीचे झाले आहे. पण आता या गावात तरी याला आळा बसणार आहे हे नक्की.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App