चॅटजीपीटी-डीप सीक सारख्या एआय टूल्सवर बंदी
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : ‘Finance Ministry केंद्रीय अर्थ मंत्रालयाने चॅटजीपीटी आणि डीप सीक सारख्या एआय टूल्स आणि अॅप्सच्या वापरावर बंदी घातली आहे. यासाठी अर्थ मंत्रालयाने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. २९ जानेवारी २०२५ रोजी जारी केलेल्या परिपत्रकाचा उद्देश संवेदनशील सरकारी डेटाची सुरक्षा सुनिश्चित करणे आणि सायबर धोके रोखणे आहे.‘Finance Ministry
सहसचिव प्रदीप कुमार सिंह यांनी स्वाक्षरी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, सरकारी संगणकांवर एआय-सक्षम अनुप्रयोगांचा वापर गोपनीय सरकारी माहितीला धोका निर्माण करू शकतो. या कारणास्तव, मंत्रालय सर्व कर्मचाऱ्यांना अधिकृत उपकरणांवर अशा साधनांचा वापर टाळण्याचा सल्ला देते.
जागतिक स्तरावर एआय बद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. एआय मॉडेल्स बाह्य सर्व्हरवर वापरकर्त्यांच्या इनपुटवर प्रक्रिया करतात. यामुळे डेटा लीक होऊ शकतो किंवा अनधिकृत प्रवेश होऊ शकतो. संवेदनशील माहितीचा गैरवापर रोखण्यासाठी विविध खासगी कंपन्या आणि संस्थांनीही एआयचा वापर मर्यादित केला आहे. इटली आणि ऑस्ट्रेलियाने चिनी एआय टूल डीपसीकवरही बंदी घातली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App