सीबीआयने आपल्या कामातून आणि तंत्राने लोकांमध्ये विश्वास निर्माण केला आहे
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (CBI) च्या हीरक महोत्सवी सोहळ्याला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्य्यावरून मार्गदर्शन करताना, सीबीआयला भ्रष्टाचारविरोधातील लढाईत अजिबात थांबू नका आणि कोणताही संकोच करू नका. असे म्हटले आहे. Do not stop hesitate in fight against corruption PM Modi tells CBI
पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘’जिथे भ्रष्टाचार होतो, तिथे तरुणांना योग्य संधी मिळत नाही. भ्रष्टाचार हा प्रतिभेचा सर्वात मोठा शत्रू आहे आणि येथूनच घराणेशाही आणि कुटुंबवादाला बळ मिळाले आहे. यापूर्वीच्या सरकारांमध्ये खूप भ्रष्टाचार झाला होता. आज देशात भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची कमतरता नाही. तुम्हाला कुठेही संकोच करण्याची, कुठेही थांबण्याची गरज नाही. सायबर गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी आपल्याला नवीन मार्ग शोधावे लागतील आणि यात तंत्रज्ञान-सक्षम उद्योजक आणि तरुणांची मोठी भूमिका आहे. ’’
Delhi Liquor Scam : मनीष सिसोदिया यांना दिलासा नाहीच, १७ एप्रिलपर्यंत तुरुंगातच असणार मुक्काम!
याचबरोबर “भ्रष्टाचाऱ्यांनी देशाची तिजोरी लुटण्याचा आणखी एक मार्ग काढला होता, जो अनेक दशकांपासून सुरू होता. तो म्हणजे सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांच्या लूटीचा होता. आज जनधन, आधार, मोबाईल या त्रिमूर्तीमुळे प्रत्येक लाभार्थ्याला त्याचा पूर्ण हक्क मिळत आहे. २०१४ नंतर, आमची पहिली जबाबदारी होती व्यवस्थेवरील विश्वास पुर्नस्थापित करणे. त्यामुळेच आम्ही काळा पैसा, बेनामी संपत्तीबाबत मिशन मोडवर कारवाई सुरू केली.’’ असं मोदींनी यावेळी सांगितलं.
https://youtu.be/HZtmHC_JuPI
"Don't stop, hesitate in fight against corruption,": PM Modi tells CBI Read @ANI Story | https://t.co/3qbrGE4AEA #PMModi #CBI pic.twitter.com/NJgS373vAK — ANI Digital (@ani_digital) April 3, 2023
"Don't stop, hesitate in fight against corruption,": PM Modi tells CBI
Read @ANI Story | https://t.co/3qbrGE4AEA #PMModi #CBI pic.twitter.com/NJgS373vAK
— ANI Digital (@ani_digital) April 3, 2023
मोदी म्हणाले, “भ्रष्टाचाऱ्यांबरोबरच आम्ही भ्रष्टाचाराच्या कारणांशीही लढत आहोत. आजही जेव्हा एखाद्या प्रकरणाची उकल होत नाही तेव्हा ते सीबीआयकडे सोपवण्याची मागणी होते. सीबीआयने आपल्या कामातून आणि तंत्राने लोकांमध्ये विश्वास निर्माण केला आहे.’’
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App