विशेष प्रतिनिधी
चेन्नई – शेतमजूराच्या खूनाचा आरोप असलेला द्रमुकचा खासदार टी. आर. व्ही. एस. रमेश तमिळनाडूतील कडलूर जिल्ह्यातील पानरुटी न्यायालयास शरण गेला. काजूच्या बागेतील शेतमजूर गोविंदराज याचा रमेश व त्याच्या सहकाऱ्यांनी खून केल्याचा आरोप आहे. गोविंदराज याच्या मुलाने तक्रार दाखल केली आहे. आतापर्यंत पाच शेतमजुरांना अटक करण्यात आली आहे.DMK MK arrested in Tamilnadu
खासदार रमेशची काजूची बाग आहे. तेथे काम करणाऱ्या गोविंदराज या ५५ वर्षीय शेतमजूराला रमेश आणि त्याच्या सहाय्यकांनी बेदम मारहाण केली. गोविंदराजने आठ किलो काजू चोरल्याचा त्यांचा आरोप होता. १९ सप्टेंबर रोजी इतर शेतमजुरांनी जखमी अवस्थेतील गोविंदराजला पोलिस ठाण्यात आणले.
पोलिसांनी त्यास रुग्णालयात दाखल करण्याची सूचना दिली, मात्र गोविंदराजला पुन्हा काजूच्या बागेत नेण्यात आले. तेथे त्याचा मृत्यू झाला.कडलूर विभागात पट्टाली मक्कल काची (पीएमके) या पक्षाचे प्राबल्य आहे.
या पक्षाचे प्रवक्ते व वकील के. बालू यांनी केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत (सीबीआय) चौकशीची मागणी केली. यातील आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे शवविच्छेदन पुदुच्चेरीत झाले असले तरी अहवाल कुटुंबीयांना अद्याप देण्यात आलेला नाही.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App