वृत्तसंस्था
बंगळुरू : कर्नाटकचे डेप्युटी सीएम डीके शिवकुमार यांनी म्हटले आहे की, ‘मागील वेळी सिद्धरामय्या कर्नाटकचे मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी भीतीपोटी एक प्रकल्प बंद केला, मी तो पूर्ण केला असता.’ बंगळुरूचे संस्थापक केम्पेगौडा यांच्या जयंतीनिमित्त शिवकुमार यांनी विधानसभेत हे वक्तव्य केले.DK Sivakumar questioned CM Siddaramaiah’s efficiency, said – If I was in his place, the project would have been done anytime.
ते म्हणाले, ‘मला बोगदे आणि उड्डाणपूल बांधण्यासाठी अनेक विनंत्या येतात. अनेक प्रकल्पांमध्ये आव्हानांनाही सामोरे जावे लागते. 2017 मध्ये मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि तत्कालीन बंगळुरू विकास मंत्री केजे जॉर्ज यांना शहरातील स्टील फ्लायओव्हर्सच्या विरोधामुळे घाबरले होते. त्यांच्या जागी मी असतो तर विरोध करणाऱ्यांपुढे झुकलो नसतो. मी हा प्रकल्प पुढे नेला असता.
प्रियांक खरगे म्हणाले- मुख्यमंत्री जनतेच्या मतांचा आदर करतात
शिवकुमार यांच्या या वक्तव्याबाबत कर्नाटकचे मंत्री प्रियांक खरगे म्हणाले, ‘सिद्धरामय्या घाबरले होते असे मी म्हणणार नाही. मुख्यमंत्री जनतेची काळजी घेतात, त्यांच्या विचारांचा आदर करतात. कधीकधी चुकीच्या गोष्टी पसरतात आणि त्यामुळे चांगले निर्णय थांबवावे लागतात. मला वाटते उपमुख्यमंत्र्यांनाही तेच म्हणायचे होते.
भाजपचा दावा– लवकरच सरकारमध्ये फूट पडेल
शिवकुमार यांच्या या विधानाला कर्नाटक काँग्रेसच्या दोन प्रमुख नेत्यांमधील दुरावा म्हणून पाहिले जात आहे. 13 मे रोजी कर्नाटक विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर काँग्रेसला मुख्यमंत्रिपदाचा निर्णय घेण्यासाठी पाच दिवस लागले. डीके शिवकुमार आणि सिद्धरामय्या या दोघांनीही मुख्यमंत्रिपदासाठी दावा केला होता. त्यानंतर हायकमांडच्या सांगण्यावरून शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्रिपदासाठी होकार दिला.
कर्नाटक भाजपचा दावा आहे की, आता दोन्ही नेते एकत्र काम करण्याचा आव आणत असले तरी लवकरच सर्वांना सरकारमध्ये फूट दिसेल. हे सरकार फार काळ टिकणार नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App