मुख्यमंत्री कोण? हा वाद नाही, आम्हाला दोन्ही नेत्यांचे नेतृत्व मान्य; शिवसेना मंत्री दीपक केसरकरांचा खुलासा


प्रतिनिधी

मुंबई : आगामी काळात होणाऱ्या निवडणुका या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढवणार असल्याचे स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. मात्र, निवडणुकीनंतर काही बदलणार असेल, तर त्याचा निर्णय दोन्ही नेत्यांनी बसून करावा, वरिष्ठांनी घेतलेल्या निर्णय आम्हाला मान्य असेल. आम्ही दोन्ही नेत्यांचे नेतृत्व मान्य करतो, असा स्पष्ट खुलासा मंत्री दीपक केसरकर यांनी केला.Chief Minister This is not a dispute we accept the leadership of both leaders Disclosure of Shiv Sena Minister Deepak Kesarkar

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये आगामी काळात निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होईल? याचा निर्णय भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ संसदीय मंडळ घेणार असल्याचे म्हटले होते. यावरून महाराष्ट्रात राजकीय चर्चा रंगली आहे.याबाबत मंत्री दीपक केसरकर म्हणाले की, ‘फडणवीस म्हणाले की आम्ही एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वाखाली निवडणुकीला सामोरे जाऊ. आता निवडणुकीला सामोरे गेल्यानंतर निवडणूक संपल्यानंतर काही चेंज होणार असतील तर ते दोघांनी बसून आणि वरिष्ठ लोकांनी बसून ठरवले पाहिजे. परंतु आज तर जे काय पक्षामध्ये दोन्ही पक्षांमध्ये ठरलेले आहे. फडणवीस यांनी स्वतः जाहील केले त्याप्रमाणे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली युती महाराष्ट्रात निवडणूक लढवेल. शेवटी असं सुद्धा असू शकते, जशी काही तडजोड असते. काही काळ तुम्ही राहा, काही काळ आम्ही राहू तर त्याला आम्ही कधीच नाही म्हणालो नाही.

उद्धव ठाकरेंकडेही केली होती मागणी

दीपक केसरकर यांनी सांगितले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव साहेबांना सांगितले होते की, तुम्हीच मुख्यमंत्री पदी राहा, परंतु भाजपबरोबर आपण युती करू या. कारण ती नॅचरल युती आहे. तुमची युती महाराष्ट्राच्या हिताची नाही. तुम्ही बघा महाविकास आघाडी संपली आणि महाराष्ट्राने विकासाच्या दृष्टीने झेप घेतली. प्रत्येक ठिकाणी रस्त्याची कामे चालू आहेत, मेट्रोची कामे चालू आहेत. हे महाराष्ट्राचे ग्रोथ इंजिन नव्याने कामाला लागले आहे.

Chief Minister This is not a dispute we accept the leadership of both leaders Disclosure of Shiv Sena Minister Deepak Kesarkar

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात