‘’निवडणुका संपताच नीट चालायला लागतील, अगोदरही…’’ ममता बॅनर्जींच्या दुखापतीवर अधीर रंजन चौधरींची खोचक टिप्पणी!


 हेलिकॉप्टरचे सिलीगुडीमध्ये आपत्कालीन लँडिंग झाले तेव्हा ममता बॅनर्जींना दुखापत झाली आहे.           

विशेष प्रतिनिधी

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मंगळवारी (२७ जून) जखमी झाल्या होत्या,  त्यांच्या हेलिकॉप्टरला सिलीगुडीमध्ये आपत्कालीन लँडिंग करावे लागले होते, त्यादरम्यान त्यांना दुखापत झाली होती. तर लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी त्या हे करत असल्याचा टोला काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी लगावला आहे. Chief Minister Mamata Banerjee is playing Drama for elections  Congress leader Adhir Ranjan Chaudhary

एवढच नाही तर निवडणुका संपल्याबरोबर त्या पुन्हा ठीक होतील आणि स्वत: चालू लागतील. अधीर रंजन म्हणाले, याआधीही राज्यात विधानसभा निवडणुका झाल्या तेव्हा त्या पायाला प्लास्टर बांधून व्हीलचेअरवर फिरत होत्या. आता राज्यात पंचायत निवडणुका आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा त्या लोकांना मूर्ख बनवण्याचे काम करत आहेत.

अधीर रंजन पुढे म्हणाले की, ममता बॅनर्जी यांची प्रतिमा लोकांची दिशाभूल करणाऱ्या नेत्याची झाली आहे. त्यांनी मीडियाला सांगितले की, तुम्ही माझे म्हणणे लक्षात घ्या की त्यांनी हे केवळ निवडणुकीसाठी केले आहे. निवडणुका संपल्याबरोबर ती पुन्हा आपल्या पायावर चालू लागतील.

Chief Minister Mamata Banerjee is playing Drama for elections  Congress leader Adhir Ranjan Chaudhary

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*