यंदाही वडेश्वर कट्ट्यावर ‘ दिवाळी फराळ ‘ कार्यक्रम ; राजकीय मतभेद विसरून केले एकमेकांचे तोंड गोड

आहे.यंदाही ही दिवाळी फराळ परंपरा कायम राहिली.वाडेश्वर कट्ट्याने गेली अनेक वर्षे जपलेली संवादाची परंपरा यानिमित्ताने पुणेकरांना अनुभवता आली.’Diwali Faral’ program on Vadeshwar Katta again this year; Forgetting political differences made each other’s mouths sweet


विशेष प्रतिनिधी

पुणे : यंदाच्या दिवाळीत राज्यात अनेक ठिकाणी राजकीय फटाके फुटत आहेत. दरम्यान पुण्यातल्या सगळ्या राजकीय पक्षांच्या शहराध्यक्षांनी एकमेकांचे तोंड गोड करत दिवाळी साजरी केली आहे. गेल्या अनेक वर्षापासून वाडेश्वर कट्ट्यावर दिवाळी फराळ कार्यक्रमाची परंपरा सुरू आहे.यंदाही ही दिवाळी फराळ परंपरा कायम राहिली.वाडेश्वर कट्ट्याने गेली अनेक वर्षे जपलेली संवादाची परंपरा यानिमित्ताने पुणेकरांना अनुभवता आली.

विशेष म्हणजे पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ आणि माजी महापौर प्रशांत जगताप यांनी दिवाळी आधीच एकमेकांवर आरोप करत फटाके फोडले होते. आज वाडेश्वर कट्ट्यावर मात्र एकमेकांना लाडू भरवून तोंड गोड करत गळाभेट घेतली.



अंकुश आण्णा व त्यांच्या टीमच्या वतीनं वाडेश्वर कट्ट्यावर दिवाळी फराळ कार्यक्रमाचं आयोजन केलं. या दिवाळी फराळाच्या निमित्ताने, मागील राजकीय मतभेद विसरून सर्वांनी एकत्र येवून, चांगल्या भावनेनं राजकारण करु’, असं मत महापौर मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले.

दिवाळी फराळ मागचा नेमका उद्देश काय

‘पुण्याची राजकीय परंपरा आहे. विचारांची लढाई ही विचारांनीच लढली जाते. आज सणाचा दिवस आहे. शेवटी निवडणूका येतात- जातात. मतभेद असावेत, मनभेद नसावेत, असा या दिवाळी फराळ मागचा उद्देश आहे.

‘Diwali Faral’ program on Vadeshwar Katta again this year; Forgetting political differences made each other’s mouths sweet

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात