वृत्तसंस्था
लखनौ : टोकियो येथे होणाऱ्या पॅरा ऑलम्पिक स्पर्धेत नोएडा येथील जिल्हा दंडाधिकारी एल. वाय. सुहास बॅडमिंटनमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. त्यांना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शुभेच्छा दिल्या. District Magistrate Suhas of Noida Shine in Paralympic Badminton
सुहास हे २००७ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी विविध जिल्ह्यात कार्य केले असून २०१९ मध्ये प्रयागराज येथे झालेल्या अर्ध कुंभ मेळ्यावेळी मोलाची कामगिरी बजावली होती.
२०१९- २०दरम्यान खेळविलेल्या विविध स्पर्धांमध्ये त्यांनी उज्ज्वल यश संपादन केले होते. त्यांनी ३ सुवर्ण, ३ रौप्य आणि काही ब्रॉन्झ पदके पटकावली आहेत. या भरीव कामगिरीची दाखल घेऊन जागतिक बॅडमिंटन संघटनेने टोकियो पॅरा ऑलिम्पिकमध्ये भाग घेण्याचे निमंत्रण दिले आहे. या स्पर्धा ऑलिम्पिक स्पर्धेनंतर होणार आहेत. नागरी सवेतील पहिले अधिकारी म्हणून स्पर्धेत भाग घेण्याची संधी त्यांना मिळाली आहे. आता त्यांच्या चमकदार कामगिरीची अपेक्षा भारत वासीयांना आहे.
नोएडात पदभार स्वीकारून त्यांना जेमतेम एक वर्ष होत आहे. कोरोना संकटात ते जनसेवा करत आहेत. स्पर्धेसाठी पुढील महिन्यात ते आठवड्यासाठी टोकियोला जाणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App