राजस्थान काँग्रेसमध्ये दुफळी! मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा सचिन पायलटवर निशाणा

सचिन पायलट आणि अशोक गेहलोत यांच्यात वाद होण्याची ही पहिलीच वेळ नाही.

विशेष प्रतिनिधी

जयपूर : राजस्थान काँग्रेसमधील अंतर्गत नाराजीनाट्य थांबलेलं नाही. राज्यात संपूर्ण पक्ष दोन गटात विभागला गेला असून एक गट सचिन पायलट यांना तर दुसरा गट मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना पाठिंबा देत आहे. मुख्यमंत्री गेहलोत यांनी राजस्थान काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना सांगितले की, पुढची निवडणूक कशी जिंकता येईल आणि त्यात आपले योगदान कसे देता येईल यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे? पक्षाचे नुकसान होईल असे काहीही करू नये. तसेच, अशोक गेहलोत यांनी पुन्हा एकदा सचिन पायलटवर निशाणा साधला आहे. Differences in Rajasthan Congress Chief Minister Ashok Gehlot targets Sachin Pilot

यापूर्वी १७ एप्रिल रोजी सचिन पायलटने जयपूरमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या विरोधात ताकद दाखवत जाहीर सभा घेतली होती. या जाहीर सभेला संबोधित करताना पायलट म्हणाले होते की, काही लोक भूतकाळ विसरतात. अशी माणसे समाजात, देशात किंवा राज्यात मोठी होतात, तर बऱ्याचदा मागे वळून पाहत नाहीत.

गेहलोत आणि पायलट यांचे जुने वैर –

सचिन पायलट आणि अशोक गेहलोत यांच्यात वाद होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही या दोघांमधील वैर सर्वांनी पाहिले आहे. वसुंधरा राजे यांच्या कार्यकाळात झालेल्या भ्रष्टाचारावर अशोक गेहलोत सरकारने कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप यापूर्वी सचिन पायलट यांनी केला होता. या मागणीबाबत गेहलोत सरकारवर दबाव आणण्यासाठी पायलटने धरणे आंदोलनही केले होते. मात्र, नंतर प्रियंका गांधी यांच्या मध्यस्थीनंतर पायलटने संप मिटवला.

Differences in Rajasthan Congress Chief Minister Ashok Gehlot targets Sachin Pilot

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात