या तारखेला एसजीएमच्या बैठकीत मान्यता दिली जाईल.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Jay Shah भारताच्या जय शाह यांनी गेल्या महिन्यातच आयसीसीचे अध्यक्षपद स्वीकारले. त्यांच्या जाण्यानंतर बीसीसीआयमधील सचिवपद रिक्त झाले. त्यानंतर देवजीत सैकिया बीसीसीआयचे अंतरिम सचिव झाले. महाराष्ट्रात झालेल्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने विजय मिळवून सरकार स्थापन केले. त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे आशिष शेलारही आमदार झाले आणि ते महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री झाले.Jay Shah
शेलार यांच्याकडे बीसीसीआयमध्ये कोषाध्यक्षपदाची जबाबदारी होती. अशा स्थितीत बीसीसीआयचे सचिव आणि कोषाध्यक्ष अशी दोन पदे रिक्त झाली आहेत. परंतु आता देवजीत सैकिया आणि प्रभातेज सिंग भाटिया यांची 12 जानेवारी रोजी होणाऱ्या बीसीसीआयच्या विशेष सर्वसाधारण सभेत (SGM) अनुक्रमे BCCI सचिव आणि कोषाध्यक्षपदी बिनविरोध निवड केली जाईल कारण निवडणूक लढवण्याच्या अंतिम यादीत ते दोनच उमेदवार आहेत.
निवडणुकीत सहभागी होणाऱ्या उमेदवारांची यादी बीसीसीआयचे निवडणूक अधिकारी आणि भारताचे माजी सीईसी (मुख्य निवडणूक आयुक्त) अचल कुमार जोती यांनी तयार केली होती. उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख गेल्या आठवड्यात संपली तर मंगळवारी दुपारी दोन वाजता अर्ज मागे घेण्याची मुदत संपली. एकाही उमेदवाराने आपले नाव मागे न घेतल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मंगळवारी सायंकाळी पाच वाजता निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली.
12 जानेवारी रोजी SGM दरम्यान निवडणुका होणार आहेत आणि त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाईल, जी आता औपचारिकता आहे. जय शाह यांनी 1 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारल्यापासून देवजीत सैकिया बीसीसीआयचे अंतरिम सचिव म्हणून काम करत आहेत. कोषाध्यक्षपदासाठी प्रभातेजसिंग भाटिया यांनी अर्ज दाखल केला. आता फक्त या दोघांच्या नावावर शिक्कामोर्तब करणे बाकी आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App