विशेष प्रतिनिधी
पणजी : केवळ मनोहर पर्रिकर यांचा किंवा अन्य कुणाचा मुलगा म्हणून भाजपात तिकीट मिळू शकत नाही. त्यांचं कर्तृत्व असेल तर त्यांचा विचार होतो, अशी स्पष्ट भूमिका गोव्याचे भारतीय जनता पक्षाचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी मांडली आहे. त्यामुळे मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर आणि फडणवीस आमने-सामने आले आहेत.Devendra Fadnavis – Utpal Parrikar face to face
माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर यांचा मुलगा उत्पल पर्रिकर यांना तिकीट मिळणार का? याबाबत संभ्रम निर्माण झाला असून, तिकीट न मिळाल्यास उत्पल पर्रिकर बंडाचा झेंडा उचलण्याच्या तयारीत आहेत, अशी चर्चा आहे. उत्पल पर्रिककर यांना तिकीट मिळणार का असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना करण्यात आला.
यावर ते म्हणाले, केवळ मनोहर पर्रिकर यांचा किंवा अन्य कुणाचा मुलगा म्हणून भाजपात तिकीट मिळू शकत नाही. त्यांचे कर्तृत्व असेल तर त्यांचा विचार होतो. यावर उत्पल पर्रिकर म्हणाले की, मला देवेंद्र फडणवीसांच्या विधानावर बोलायचं नाही. मात्र केवळ पर्रिकरांचा मुलगा म्हणून मला तिकीट हवं असतं तर ते मी २०१९ मध्येच मागितलं असतं.
भाजपाचे अनेक कार्यकर्ते १९९४ पासून माझ्या वडिलांसोबत काम करत होते. ते आता माझ्यासोबत काम करत आहेत उमेदवारी संदर्भात जो काही निर्णय घ्यायचा तो मी घेऊ शकत नाही. तो निर्णय आमच्या पार्लमेंटरी बोर्डाचा आहे., ते त्यासंदभार्तील निर्णय घेईल, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App