Devendra Fadnavis बीडचा गुंता राष्ट्रवादीनेच वाढविला, तर तो तुम्हीच सोडवा; अजितदादा + धनंजय मुंडे प्रकरणात फडणवीसांचा अप्रत्यक्ष निशाणा!!

Devendra Fadnavis

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : बीड मधल्या संतोष देशमुख प्रकरणांमध्ये चोहोबाजूंनी अडचणीत आल्यानंतर धनंजय मुंडे दिल्लीच्या दौऱ्यावर गेले होते. तिथे त्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट झाली. त्यानंतर आज बीड जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीसाठी नूतन पालकमंत्री अजित पवार तिथे पोहोचले. तिथे त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना चारित्र्य टिकवण्याची दमबाजी केली.

अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बीड जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादीच्या आमदार – खासदारांमध्ये खडाजंगी झाली. सगळ्यांनी मिळून धनंजय मुंडे यांना टार्गेट केले.

Sanjay Raut : मुंबईत स्वबळावर, महाराष्ट्रात इतरत्र आघाडी, संजय राऊत न्यांचा फॉर्मुला

या सगळ्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणार का??, असा सवाल पत्रकारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत विचारला. त्यावर उत्तर देताना या संदर्भात अजित पवारांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. तीच सध्यातरी सरकारची अधिकृत भूमिका आहे, असे उत्तर फडणवीस यांनी दिले. यातून फडणवीस यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीलाच अप्रत्यक्षपणे जमालगोटा दिला.

बीड मधल्या संतोष देशमुख गुंतागुंतीच्या सगळ्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस मधल्या राजकारणाचे सगळे ताणेबाणे गुंतलेत. बीड मधल्या गुंड प्रवृत्तीला राष्ट्रवादी काँग्रेसनेच खतपाणी घातले. धनंजय मुंडे विरुद्ध सगळे आमदार या सगळ्या प्रकरणाचा गुंतडा राष्ट्रवादी मधलाच आहे. तो तुमचे तुम्हीच सोडवा, अशी अप्रत्यक्ष भूमिका घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या खांद्यावर बंदूक ठेवल्याचे बोलले जात आहे. अजित पवार तो गुंतडा सोडवू शकले नाहीत, तर नंतर फडणवीस त्यामध्ये लक्ष घालून भाजपच्या पद्धतीने तो गुंतडा सोडवतील, असेच त्यांनी अप्रत्यक्षपणे सूचित केले.

Devendra Fadnavis  indirect target in the Ajitdada + Dhananjay Munde case

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात