
विशेष प्रतिनिधी
पणजी : गोव्यातील पोरीम मतदारसंघातून कॉँग्रेसचे माजी मुख्यमंत्री आणि तब्बल ५० वर्षे या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणारे प्रतापसिंह राणे यांनी माघार घेतली आहे. त्यांच्या सूनबाई भारतीय जनता पक्षातर्फे लढणार आहेत. गोव्याचे भाजपचे प्रभारी सप्टेंबरमध्ये राणे यांना समजावले होते. चार महिन्यानंतर राणे यांच्याकडून त्याला प्रतिसाद मिळाल्याचे बोलले जात आहे.Devendra Fadnavis had met Pratap Singh Rane four months ago. Rane took the decision after four months due to his explanation.
सप्टेंबरमध्ये, फडणवीस यांनी प्रतापसिंह राणे यांची त्यांच्या निवासस्थानी रात्रीच्या जेवणाच्या वेळी भेट घेतली. त्यानंतर त्यांचा मुलगा विश्वजित राणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी आणि आत्ताही प्रतापसिंह राणे म्हणत आहेत की मी कॉँग्रेसचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. मात्र, शुक्रवारी त्यांनी अखेर निवडणून लढवायची नाही असा निर्णय घेतला.
गोव्याच्या राजकीय वतुर्ळात काही दिवसांच्या अनिश्चिततेनंतर आणि राणे नेमके काय करायचे याविषयीच्या अनेक अटकळी लावल्या होत्या. त्यांचे पुत्र विश्वजित राणे यांनीच सन्मानाने निवृत्त व्हा असा सल्ला दिला होता. पोरीम मतदारसंघातून त्यांच्या सूनबाई देविया राणे निवडणूक लढवित आहेत. कुटुंबात कलह नको म्हणून प्रतापसिंह राणे यांनी हा निर्णय घेतला आहे.
राणे हे गोव्यातील सरदार घराण्यातील आहे. 18व्या शतकात पोतुर्गीजांनी गोवा जिंकेपर्यंत सावंतवाडीच्या सावंत-भोसल्यांचे ते सरदार होते. 1755 ते 1822 दरम्यान पोतुर्गीज शासकांविरुद्ध राणेंनी 14 उठाव केले. प्रतापसिंह राणे अमेरिकेतून एबीएची पदवी मिळविली आहे. त्यानंतर तत्कालिन मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर यांनी त्यांना राजकारणात येण्याचे आवाहन केले होते.
प्रतापसिंह राणे 1972 मध्ये पहिल्यांदा आमदार झाले आणि 1980 मध्ये गोव्याचे मुख्यमंत्री झाले. 1987 मध्ये गोव्याला राज्याचा दर्जा मिळाला तेव्हाही राणे मुख्यमंत्री होते. त्यांनी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षामधून राजकीय कारकिदीर्ची सुरुवात केली आणि त्यानंतर 1970 च्या दशकात काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
Devendra Fadnavis had met Pratap Singh Rane four months ago. Rane took the decision after four months due to his explanation.
महत्त्वाच्या बातम्या
- एकाच पक्षाला कोर्टातून दिलासा कसा मिळतो? भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन रद्द झाल्यावर संजय राऊत यांचा सवाल
- ADR Report : भाजपने 2019-20 मध्ये 4847 कोटींची संपत्ती जाहीर केली, इतर राजकीय पक्षांची काय आहे स्थिती? वाचा सविस्तर…
- दिल्लीतील सामूहिक बलात्कार प्रकरणात आतापर्यंत नऊ जणांना अटक, ९ महिलांसह ११ आरोपी, दिल्ली पोलिसांची माहिती
- UP Election : भाजपची 91 उमेदवारांची यादी जाहीर, मुख्यमंत्री योगींचे माध्यम सल्लागार शलभमणी यांना देवरियातून तिकीट
Array