जनजाती क्षेत्रात सेवा कार्याद्वारे विकास हे देशाच्या परम वैभवाचे एक यशस्वी पाऊल!!

Development

विशेष प्रतिनिधी

नाशिक : जनजातीय क्षेत्रातील सेवाषकार्याद्वारे चाललेला विकास म्हणजे देशाच्या परम वैभवाच्या दृष्टीने चाललेली यशस्वी वाटचाल आहे, असे उद्गार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यकर्ते दिलीप क्षीरसागर यांनी जनजाती कल्याण आश्रम इंजिनिअर्स ग्रुपतर्फे आयोजित सेवाकार्यात आर्थिक आणि अन्य मदत करणारे व्यक्ति, संस्था तसेच आस्थापना यांचा ऋणनिर्देश कार्यक्रम व कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना काढले.Development through service work in the tribal sector Development is a successful step towards the supreme glory of the country!!

समाजातील वंचित, शोषित, पीडित समाजाला त्याच्या किमान आवश्यक गरजांसाठी ज्यांच्याकडे शक्ती, बुद्धी, संपदा आहे त्यांनी ती वापरली पाहिजे. संघटित समाजासाठी सशक्त समाज देखील आवश्यक असतो, तेच काम इंजिनिअर्स ग्रुपतर्फे करीत असल्याचा गौरव क्षीरसागर यांनी केला.



 

या कार्यात मदत करणाऱ्या सर्वांचा ऋणनिर्देश कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आर्थिक सहाय्य करणारे एबीबी कंपनीचे मुख्य अधिकारी गणेश कोठावदे यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच मदत करणारे क्रेडाई अध्यक्ष कृणाल पाटील, शंतनू देशपांडे. टिब्रिवाला, संजीव कौशिक, महिंद्रा अँड महिंद्रा, एपी रॉक, फॉक्स यांच्या अधिकारी, नरेडको, क्रेडाई मेट्रो नाशिक, आयुर्वेद सेवा संघ, रोटरी क्लब या संस्थांचा सत्कार करण्यात आला. तसेच जनजाती लाभक्षेत्रातील कार्यकर्ते हरी पागी,अंबादास गांगुर्डे यांनी या विकास कामात ग्रामस्थांच्या सहभागाचे आश्वासन दिले.

यावेळी व्यासपीठावर जनजाती कल्याण आश्रम प्रांत अध्यक्ष डॉ. भरत केळकर, शहर अध्यक्ष डॉ. बाबूलाल अग्रवाल, विवेक पेंडसे व गुही शालेय समिती अध्यक्ष सुनिल सावंत हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण जोशी यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अखिल भारतीय जनजाती कल्याण आश्रमाच्या स्थापत्य अभियंता विभागाचे पदाधिकारी कार्यरत होते.

चौकट

इंजिनीयर ग्रुप तर्फे पेठ सुरगणा तालुक्यांत जलसंवर्धनाचे काम!!

इंजिनिअर्स ग्रुप तर्फे पेठ, सुरगाणा तालुक्यात जलसंवर्धन संवर्धनाचे यशस्वी कार्य सुरू आहे. जवळपास वीस कोटी लिटर पाण्याची साठवणूक क्षमता असलेले छोटे बंधारे बांधण्यात आलेले आहेत. यासाठी नाशिक मधील बांधकाम व्यावसायिक तसेच आर्किटेक्ट,इंजिनियर्स, सर्वेअर्स अशा विविध व्यवसायिकांचा एक समूह जनजाती कल्याण आश्रमाच्या माध्यमातून आरोग्य,जलसंवर्धन, शिक्षण, वृक्ष लागवड, धर्मजागरण आदी आयामांवर काम करीत आहे.

Development through service work in the tribal sector Development is a successful step towards the supreme glory of the country!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात