विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारताविरुध्द सातत्याने कुरापती काढणाºया चीनला धडा शिकविण्यासाठी गेल्या वर्षी चीनी अॅप्सवर बंदी घालण्यात आली होती. मात्र, यातील बहुतांश अॅप्स नव्या अवतारात भारतात आली आहे. त्यांचा वापरही वाढत आहे.Despite the ban, the use of new incarnations of Chinese apps is on the rise
सीमेवरील चीनच्या आगळिकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या डाटाचे संरक्षण करण्याबरोबरच देशाच्या सुरक्षिततेसाठी चीनी अॅप्सवर बंदी घालण्यात आली होती. टिकटॉक, यूसी ब्राउझर, पीयूबीजी, हेलो, अलीएक्सप्रेस, लाइक, शेअरिट, एमआय कम्युनिटी, वीचॅट आणि कॅमस्कॅनर, बायडू सर्च, वीबो, बिगो लाईव्ह या अॅप्सवर बंदी घालण्यात आली होती.
इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने या अॅप्सवर बंदी घातलीहोती. भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राकडून मिळालेल्या अहवालांच्या आधारे, सरकार नागरिकांच्या हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी आणि सर्व आघाड्यांवर भारताची सार्वभौमत्व आणि अखंडतेसाठीही बंदी घालण्यात आली असल्याचे सरकारतर्फे सांगण्यात आले होते.
मात्र, गेल्या वर्षभरात नवीन अवतारात ही अॅप्स भारतात दाखल झाली आहेत. त्यांनी आपले चीनी मूळ लपविण्यासाठी नवीन कंपनीचे नाव धारण केले आहे. मात्र, त्यांच्या भारतातील प्रवेशाकडे दूर्लक्ष करण्यात आले आहे. ही अॅप्स नवीन कंपनीच्या नावांसह लॉँच करण्यात आली आहेत. त्यांच्या मालकीबद्दलही माहितीही संभ्रमात टाकणारी आहे. यातील बहुतांश अॅप्स ही मीडिया आणि मनोरंजन क्षेत्राशी संबंधित आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App