वृत्तसंस्था
लंडन : अफगाणिस्तानात तालिबानी सरकारमधील हक्कानी आणि बरदार गटात सत्तासंघर्ष शिगेला पोचला आहे. या संघर्षातून उपपंतप्रधान मुल्ला बारदारला ओलिस ठेवण्यात आले असून गटाचा आध्यात्मिक नेता हैबतुल्लाह अखुंदजादा ठार झाल्याचा खळबळजनक दावा ब्रिटनचे नियतकालिक द स्पेक्टेटरने केला आहे. Deputy Prime Minister of Afghanistan Mullah Bardar is Hostege ; Haibatullah killed Akhundzada; A shocking claim by Britain’s The Spectator magazine
तालिबानमधील सत्तेच्या संघर्षात मुल्ला बारदार आणि हैबतुल्लाह अखुंदजादा हे हक्कानी गटाकडून टार्गेट झाले आहेत. दाव्यात म्हंटले आहे की, सरकारच्या स्थापनेच्या चर्चेदरम्यान बारदार गट आणि हक्कानी नेटवर्क यांच्यात ठिणगी उडाली आणि त्याचा भडका उडाला. त्यातून संघर्ष आणखी चिघळला आहे.
पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स (आयएसआय) च्या प्रमुखानेही हक्कानी गटाला पाठींबा दिला. सर्व प्रमुख पदे पाकिस्तानी निष्ठावंतांकडे जावीत, असे षडयंत्र रचले.
सप्टेंबरच्या सुरुवातीला उडालेल्या चकमकींमध्ये एका टप्प्यावर, हक्कानी नेटवर्कचा नेता खलील-उल-रहमान हक्कानी हा त्याच्या खुर्चीवरून उठला आणि त्याने बारदारला ठोसा मारण्यास सुरुवात केली. बारदार यांनी “सर्वसमावेशक” मंत्रिमंडळासाठी आग्रह धरला होता ज्यात तालिबान नसलेले नेते आणि वांशिक अल्पसंख्याक यांचा समावेश होता. ही बाब हक्कानी गटाला अमान्य होती.
या संघर्षानंतर बारदार काही काळासाठी गायब झाला आणि कंदहारमध्ये पुन्हा दिसला. त्याने तेथे आदिवासी नेत्यांची बैठक घेतली. परंतु तालिबानच्या सरकारी टीव्ही नेटवर्कवर एक व्हिडिओ संदेश देण्यात आला. त्यात बारदारला ओलिसासारखी वागणूक दिल्याचे स्पष्ट झाले.
द स्पेक्टेटरने असे म्हंटले आहे की, सर्वोच्च धार्मिक नेता हैबतुल्लाह अखुंदजादा याचा ठावठिकाणा माहित नाही. “त्याला काही दिवसंपासून पाहिले गेलेले नाही किंवा तो ठार झाला असावा. ”
तालिबानीच्या शीर्षस्थानी असलेल्या नेतृत्वात आता मोठी पोकळी झाल्यामुळे तालिबानी गटांमध्ये वाद आणखी उफाळून येण्याची शक्यता वाढली आहे. गेल्या दोन दशकांपूर्वी आणि त्यापूर्वीच्या राजवटीत पाहिली नव्हते, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
अहवालात पुढे म्हटले आहे. तालिबान आणि हक्कानी गट २०१६ मध्ये विलीन झाले. बारदार आणि दोहा येथे झालेल्या चर्चेत सहभागी असलेले सदस्य तालिबानची मध्यममार्गी आणि सर्वसमावेशक प्रतिमा मांडण्याचा प्रयत्न करत होते. परंतु हक्कानी गटाने त्याला विरोध करून या सर्वसमावेशक धोरणाला सुरुंग लावला आहे.
दरम्यान, अफगाणिस्तानचे निर्वासित मंत्री खलील हक्कानी हा दहशतवादी आहे. तो संयुक्त राष्ट्रांच्या निर्बंधांच्या यादीत आहे. दहशतवादी कारवायांशी तो जोडला गेला आहे. हक्कानी गटाची पाळेमुळे पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणेमध्ये खोलवर रुतली आहेत. इस्लामाबादच्या दारुल उलूम हक्कानिया मदरशात खलील हक्कानीचे नाव कौतुकाने आणि आदराने घेतले जाते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App