वृत्तसंस्था
भोपाळ : मध्य प्रदेशात ह्यावर्षी जानेवारीपासून डेंग्युच्या चोवीसशे रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या ९५ जणांवर वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार सुरु आहेत. Dengu casaes risened in Mp
रुग्णालयात दाखल कराव्या लागणाऱ्या रुग्णांची टक्केवारी २० इतकी आहे. सर्वाधिक संसर्ग मंदसौर जिल्ह्यात असून तेथे ८०० रुग्णांची नोंद झाली. त्यातील दिडशे जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. त्याखालोखाल जबलपूरमध्ये ३२५ रुग्णांची नोंद झाली. भोपाळ, इंदूर, आदी ठिकाणीही हे रुग्ण आढळले आहेत.
जबलपूर महापालिकेने घरांची तपासणी मोहीम सुरु केली आहे. डासांच्या आळ्या सापडणाऱ्या ठिकाणी घरमालकांना दोनशे रुपये दंड ठोठावला जात आहे.
मानवी हक्क आयोगाच्या मध्य प्रदेश शाखेने डेंग्युच्या साथीची दखल घेतली आहे. डेंग्युविरुद्ध राज्य सरकारने काय पावले टाकली याची माहिती द्यावी असे राज्याचे मुख्य सचिव आणि आरोग्यसेवा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांना सांगण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App