‘नारी शक्ती वंदन कायदा’द्वारे लोकशाही बळकट होईल – पंतप्रधान मोदी


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : महिला आरक्षणाबाबत पंतप्रधान मोदींनी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी ‘नारी शक्ती वंदन कायदा’ आणल्याची माहिती दिली आहे. नवीन लोकसभेतील आपल्या पहिल्या भाषणात पंतप्रधानांनी सर्व खासदारांना हे विधेयक एकमताने मंजूर करण्याचे आवाहन केले. Democracy will be strengthened through Nari Shakti Vandan Act PM Modi

मोदी आपल्या भाषणात म्हणाले की, ”गेल्या अनेक वर्षांपासून महिला आरक्षणाबाबत अनेक चर्चा आणि संवाद होत आहेत. ते प्रथम 1996 मध्ये समोर आले. अटलजींच्या काळात हे अनेकवेळा सादर करण्यात आले, परंतु संख्याबळ नसल्यामुळे पास होऊ शकले नाही. नारी शक्ती वंदन कायद्याद्वारे लोकशाही बळकट होईल. हे विधेयक एकमताने मंजूर करण्याची विनंती करून मी सभागृहातील सर्व सहकाऱ्यांचे आभार मानतो.”

महिला आरक्षण विधेयक लवकरच लोकसभेत मांडले जाऊ शकते. महिला सक्षमीकरणाच्या दिशेने केंद्र सरकारचे हे मोठे पाऊल मानले जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, महिला आरक्षण विधेयक हे संविधानाच्या 128 व्या दुरुस्ती विधेयकाच्या रूपात सादर केले जाईल.

Democracy will be strengthened through Nari Shakti Vandan Act PM Modi

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात